Devar Bhabhi UP Crime News: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील उत्राव पोलीस स्टेशन परिसरातील पुरुषोत्तमपूर गावात शनिवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. एका दीराने आपल्या वहिनीची काठीने मारहाण करून निर्घृणपणे हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने वहिनीला ठार मारल्याचे कारण ती त्याचे ऐकत नव्हती, असे सांगितले जात आहे.
वहिनीला हाताला धरून घरी आणलं...
पुरुषोत्तमपूर गावातील रहिवासी राम बाबू पाल यांची पत्नी चंदा शनिवारी दुपारी साडेबारा वाजता घरापासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या शेतात शेतीसंबंधीची कामं करत होती. त्याच वेळी तिचा दीर राम कैलाश उर्फ गोरेलाल तिथे पोहोचला आणि तिला पकडले आणि घरी घेऊन आला. त्याने तिला पुन्हा शेतात जाण्यास मनाई केली. पण काही वेळाने चंदा पुन्हा शेतात गेली आणि तिच्यासोबत गावातील दोन मुलीही होत्या.
वहिनीने ऐकलं नाही म्हणून संतापला दीर
वहिनीने ऐकलं नाही तेव्हा राम कैलाश रागावून शेतात पोहोचला. त्याच्या हातात काठी होती. चंदाला काही समजण्यापूर्वीच त्याने तिला मारहाण करायला सुरुवात केली. तो तिला मरेपर्यंत मारहाण करत राहिला. तिचा जीव गेल्याचे कळताच आरोपी दीर तेथून पळून गेला.
वारंवार वाद होत असल्याची माहिती
पोलिसांनी मृत चंदाच्या कुटुंबीयांची चौकशी केली तेव्हा त्यांना सांगण्यात आले की राम कैलाश चंदाच्या मागे लागायचा, तिच्याच भोवती फिरत राहायचा. चंदाला त्याचा स्पर्श आवडत नव्हता, ज्यामुळे तिने त्याला अनेकदा फटकारले होते. राम कैलाश अनेकदा यावरून चंदाशी वाद घालत असे. त्याने तिला दोन-तीन वेळा मारहाणही केली होती.
आरोपी जेरबंद
यासंदर्भात, उत्तरन पोलिस स्टेशनचे प्रभारी त्रिपाठी म्हणाले की, चंदाचा तिचा खून करणारा तिचा दीर राम कैलाश याला पकडण्यात आले आहे. त्याला गावाजवळूनच अटक करण्यात आली आहे.