शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नोकराचा मालकाच्या पैशावर डल्ला; लाखो रुपये चोरुन SIP, FD अन् विम्यात गुंतवणूक केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 11:49 IST

UP Crime: चोरलेल्या पैशातून गावाकडे १० लाख रुपयांची जमीनही खरेदी केली.

UP Crime: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या निशातगंज परिसरातून चोरीची विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. सहसा चोरीचा आरोपी पैसे घेऊन पळून जातो किंवा चैनीच्या वस्तूंवर खर्च करतो, परंतु लखनऊमधील घटना पूर्णपणे वेगळी आहे. एका व्यावसायिकाच्या घरात काम करणाऱ्या नोकराने घरातून लाखो रुपये आणि दागिने चोरले. मात्र, त्याने पळून न जाता किंवा चैनीच्या वस्तू खरेदी न करता, हे पैसे विविध योजनेत गुंतवले. आरोपीने चोरीच्या पैशातून विमा पॉलिसी खरेदी केली, एसआयपी आणि एफडीमध्ये गुंतवणूक केली. इतकेच नाही, तर त्याने दहा लाख रुपयांची जमीनदेखील खरेदी केली. 

अनेक वर्षांपासून कराये चोरीसंबंधित व्यावसायिकाने पोलिसांना सांगितले की, त्याच्या घरात काम करणारा नोकर आणि त्याची पत्नी मूळचे बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील आहेत. दोघेही अनेक वर्षांपासून त्याच्या घरात काम करत होते. त्यांनी मालकाचा विश्वास संपादन केला होता, त्यामुळे त्यांना घराच्या प्रत्येक खोलीत जाण्याची मुभा होती. या नोकर जोडप्याने या विश्वासाचा गैरफायदा घेत नियोजनबद्ध पद्धतीने चोरी सुरू केली.

रोख आणि दागिने गायब आरोपी नोकराने घरातून लाखो रुपये रोख आणि लाखोंचे दागिने चोरले. सुरुवातीला मालकाला काहीच समजले नाही. मात्र, नंतर त्याने कपाटांची तपासणी केली तेव्हा त्याला संशय आला. त्याने याबाबत नोकराची विचारपूस केली तेव्हा आरोपीने चोरीची कबुली दिली. चौकशीदरम्यान नोकराने सांगितले की, त्याने चोरीचे पैसे खर्च केले नाहीत, तर त्याच्या शहरातील एका बँक कर्मचाऱ्याच्या मदतीने ते विविध ठिकाणी गुंतवले. त्याने या पैशांतून विमा पॉलिसी खरेदी केल्या, एसआयपी आणि एफडीमध्येही गुंतवणूक केली. इतकेच नाही तर दहा लाख रुपयांची जमीन देखील खरेदी केली. 

फसवणूक करुन दोघेही पळून गेलेआरोपी नोकराने चोरलेले सामान परत देण्याचे आश्वासन देण्याचे नाटक केले आणि पत्नीसह पळून गेला. त्यानंतर व्यावसायिकाने ताबडतोब पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी नोकर आणि त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. पोलिस या प्रकरणात बँक कर्मचाऱ्याची भूमिकाही तपासत आहेत. व्यावसायिकाने पोलिसांना सांगितले की, आरोपी नोकराने चौकशीत स्पष्टपणे सांगितले होते की, त्याने बँक कर्मचाऱ्याच्या मदतीने गुंतवणूक केली. 

गुंतवणुकीच्या नावाखाली कोणत्या योजनांमध्ये किती पैसे गुंतवले गेले आहेत आणि कोणत्या कंपन्यांमध्ये किंवा बँकांमध्ये व्यवहार केले गेले आहेत याचा तपास पोलिस करत आहेत. पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की ही सामान्य चोरीची घटना नाही तर एक नियोजित आर्थिक गुन्हा आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की आरोपीविरुद्ध पुरेसे पुरावे गोळा केले जात आहेत. गुंतवणूक कागदपत्रे, बँक खाती आणि व्यवहारांची माहिती गोळा केली जात आहे. लवकरच नोकर आणि त्याच्या पत्नीला अटक केली जाईल. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशRobberyचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसInvestmentगुंतवणूक