अनैसर्गिक संबंधांसाठी मित्राकडून जबरदस्ती; दगडाने ठेचून केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 13:54 IST2021-03-23T13:50:51+5:302021-03-23T13:54:13+5:30
crime news : दिल्लीच्या मयूर विहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली.

अनैसर्गिक संबंधांसाठी मित्राकडून जबरदस्ती; दगडाने ठेचून केली हत्या
नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीत एका तरुणाने आपल्या मित्राची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येमागील कारण उघडकीस आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला झाले. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, तो तरूण आपल्या मित्रावर अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत असल्याचे समोर आले. त्याला वैतागून मित्राने त्याची हत्या केली. (Youth murdered by his close friend for Demanding unnatural sex in Delhi)
दिल्लीच्या मयूर विहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. भरत असे मृत तरुणाचे नाव आहे. तो त्रिलोकपुरी येथे राहात होता. तर मोनू असे मारेकरी तरुणाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. मृत तरुण आणि आरोपी मोनू हे दोघेही मित्र होते.
डीसीपी दीपक यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास मयूर विहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस गस्त घालत होते. त्रिलोकपुरी परिसरात एक तरुण त्यांच्या नजरेस पडला. त्याचे कपडे रक्ताने माखलेले होते. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता, मित्राची हत्या केल्याची कबुली त्याने दिली. पोलीस ठाण्यातच हजर होणार असल्याचेही तो म्हणाला. पोलिसांनी तात्काळ तरुणाला ताब्यात घेतले. त्याला सोबत घेऊन पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेथून भरतचा मृतदेह ताब्यात घेतला.
याचबरोबर, डीसीपी दीपक यादव सांगितले की, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून मोनू हा अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होता. त्यामुळे वैतागून त्याची दगडाने ठेचून हत्या केल्याचे आरोपीने सांगितले. दोघांमध्ये पैशांच्या व्यवहारावरूनही वाद होते अशी माहिती मिळाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.