पैशासाठी जाचहाट करत पत्नीशी अनैसर्गिक संबंध, पतीसह चौघांवर गुन्हा

By रूपेश हेळवे | Updated: March 16, 2023 18:23 IST2023-03-16T18:23:16+5:302023-03-16T18:23:29+5:30

पुणे येथील पीडितेचे सोलापुरातील आरोपी मुलाशी विवाह झाला होता. विवाहानंतर एक वर्षांनी आरोपीने पीडितेला माहेरून दोन लाख रूपये घेऊन ये म्हणत त्रास देऊ लागला.

Unnatural relationship with wife in pursuit of money, four accused including husband | पैशासाठी जाचहाट करत पत्नीशी अनैसर्गिक संबंध, पतीसह चौघांवर गुन्हा

पैशासाठी जाचहाट करत पत्नीशी अनैसर्गिक संबंध, पतीसह चौघांवर गुन्हा

सोलापूर : घर बांधण्यासाठी माहेरून दोन लाख रूपये घेऊन ये म्हणत पत्नीचा छळ करत तिच्याशी अनैसर्गिक संबंध ठेवल्याप्रकरणी पतीवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच जाचहाट केल्याप्रकरणी पती, सासू, नणंद, मावस सासू यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पुणे येथील पीडितेचे सोलापुरातील आरोपी मुलाशी विवाह झाला होता. विवाहानंतर एक वर्षांनी आरोपीने पीडितेला माहेरून दोन लाख रूपये घेऊन ये म्हणत त्रास देऊ लागला. पण पीडितेच्या वडिलांनी पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर पीडितेवर चोरीचा आळ घेत तिला मानसिक त्रास देऊ लागले. 

शिवाय घालून पाडून बोलू लागले. शिवाय, पीडितेच्या पतीने पीडितेची इच्छा नसतानाही अनैसर्गिक संबंध ठेवले. त्यानंतरही वारंवार त्याने अशा प्रकारे संबंध ठेवले. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

Web Title: Unnatural relationship with wife in pursuit of money, four accused including husband