खळबळजनक! अज्ञात महिलेचा जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 17:41 IST2020-12-22T17:40:14+5:302020-12-22T17:41:11+5:30
Murder : हत्या करून मृतदेह जाळण्याचा केला प्रयत्न

खळबळजनक! अज्ञात महिलेचा जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
ठळक मुद्देअंबरनाथच्या पालेगाव भागात हायवेजवळ हा मृतदेह आढळून आला.
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये एका अज्ञात महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली. अंबरनाथच्या पालेगाव भागात हायवेजवळ हा मृतदेह आढळून आला.
पालेगाव भागात डोंबिवली बदलापूर पाईपलाईन रोडला लागून हा अज्ञात महिलेचा मृतदेह टाकण्यात आला होता. या महिलेची हत्या करून तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याबाबतची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि रुग्णालयात पाठवला. या महिलेची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू असून तिची हत्या नेमकी कुणी आणि का केली? याचा तपास शिवाजी नगर पोलीस करतायत.