Crime News: शेगाव शहर पोलीस ठाण्यावर अज्ञात समाजकंटकांचा हल्ला, ८ ते १० जणांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 10:45 IST2022-02-07T10:44:27+5:302022-02-07T10:45:52+5:30
Crime News: शेगाव शहर पोलीस ठाण्यावर अज्ञात समाजकंटकांनी मध्यरात्री हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात शेगाव शहर पोलीस ठाण्यामधील सामानाची आणि फर्निचरची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली.

Crime News: शेगाव शहर पोलीस ठाण्यावर अज्ञात समाजकंटकांचा हल्ला, ८ ते १० जणांविरोधात गुन्हा दाखल
बुलडाणा - शेगाव शहर पोलीस ठाण्यावर अज्ञात समाजकंटकांनी मध्यरात्री हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात शेगाव शहर पोलीस ठाण्यामधील सामानाची आणि फर्निचरची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली.
शेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विश्वनाथनगरमध्ये डीजे सुरू असताना तो बंद करण्यासाठी पोलिसांनी सूचना केल्यानंतर हा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी आठ ते दहा अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.