शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीला बेडया; रवी पुजारीपासून विभक्त होऊन बनवली होती आपली गॅंग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 17:00 IST

Underworld Don Suresh Pujari Arrested : पुजारीला १५ ऑक्टोबर रोजी पकडण्यात आले.

ठळक मुद्देसुरेश पुजारी मूळचा उल्हासनगरचा आहे. २००७ साली तो भारतातून पळून गेला.सुरेश पुजारीच्या अटकेनंतर आता अंडरवर्ल्ड जवळजवळ संपले आहे.

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीला फिलिपिन्समध्ये अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारला यासंदर्भात फिलीपिन्सकडून माहिती देण्यात आली आहे. आता त्याला भारतात प्रत्यार्पण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुजारीला १५ ऑक्टोबर रोजी पकडण्यात आले. मुंबई पोलीस, सीबीआय व्यतिरिक्त तो एफबीआयच्या रडारवर होता.सुरेश पुजारी यापूर्वी डॉन रवी पुजारीसोबत काम करत होता. सुमारे दहा वर्षांपूर्वी त्याने रवी पुजारीपासून वेगळे होऊन स्वतःची टोळी तयार केली होती. वसुलीसाठी तो नवी मुंबई, मुंबई आणि ठाण्यातील डान्सबार मालकांना नियमित कॉल करत असे. ज्यांनी पैसे दिले नाही त्यांच्यावर तो गोळ्या झाडत असे. वर्ष 2018 मध्ये, त्याच्या शार्प शुटरने कल्याण-भिवंडी महामार्गावर के. एन. पार्क हॉटेलला लक्ष्य करून गोळीबार करण्यात आला. रिसेप्शनवर बसलेल्या कर्मचाऱ्यालाही गोळी लागली होती.पुजारी टोळीच्या अनेक डॉनना अटक करण्यात आलीयानंतर सुरेश पुजारी यांनी पुन्हा या हॉटेलच्या मालकाला बोलावून २५ लाख रुपयांचा हफ्ता मागत होता. त्या प्रकरणात सुरेश पुजारी टोळीतील सुमारे अर्धा डझन लोकांना मुंबई गुन्हे शाखेचे निरीक्षक अजय सावंत आणि सचिन कदम यांनी अटक केली होती. त्यानंतरही, या डॉनचे बरेच लोक वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये पकडले गेले आणि त्यांच्या माध्यमातून तो परदेशात कुठे आहे याचा मागोवा घेण्याचे प्रयत्न सुरू होते.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांना सुरेश पुजारीबद्दल माहिती मिळाली की, तो २१ सप्टेंबरपासून फिलिपिन्समध्ये आहे. त्यानंतर इंटरपोलला केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत सतर्क करण्यात आले. सुरेश पुजारीशी संबंधित माहिती इंटरपोलशी शेअर केली गेली. त्यात तो पकडला गेला.२००७ मध्ये भारतातून पळून गेलासुरेश पुजारी मूळचा उल्हासनगरचा आहे. २००७ साली तो भारतातून पळून गेला. सुरेश पुजारी वगळता ते सुरेश पुरी आणि सतीश पै या नावांनी वेगवेगळ्या देशांमध्ये राहत होते. स्वाभाविकच, त्याला या नावांनी बनावट पासपोर्टही मिळाले होते.सुरेश पुजारीच्या अटकेने अंडरवर्ल्ड संपला!सुरेश पुजारीच्या अटकेनंतर आता अंडरवर्ल्ड जवळजवळ संपले आहे. छोटा राजन, रवी पुजारी, एजाज लकडावाला सारख्या डॉनना गेल्या दशकात भारतात हद्दपार करण्यात आले आहे. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर आणि पुतण्याला अटक केल्यानंतर मुंबईत डी गँगच्या कारवायाही नियंत्रणात आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांच्या विशेष सेल आणि महाराष्ट्र एटीएसने दाऊदचा भाऊ अनीसशी संबंधित काही लोकांना दहशतवादी प्रकरणात अटक केली होती. 

टॅग्स :Ravi pujariरवि पूजारीArrestअटकMumbaiमुंबईunderworldगुन्हेगारी जगतDawood Ibrahimदाऊद इब्राहिम