शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

काकांचा सूड उगवला पुतण्यावर; अल्पवयीन मुलाचे अपहरण करून हत्या करणारा गजाआड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 23:05 IST

Kidnapping And Murder : उपराजधानीत प्रचंड खळबळ; एमआयडीसीत तणाव

ठळक मुद्देएमआयडीसी पोलिसांनी आरोपी सूरज रामभूज शाहू (वय २५) याला अटक केली असून त्याचा न्यायालयातून पीसीआरही मिळवला आहे.

नागपूर : ओळखीच्या मुलाचे अपहरण करून अपहरणकर्त्याने त्या निष्पाप मुलाची हत्या केली. शुक्रवारी पहाटे ही थरारक घडामोड उघड झाल्याने उपराजधानीत प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी आरोपी सूरज रामभूज शाहू (वय २५) याला अटक केली असून त्याचा न्यायालयातून पीसीआरही मिळवला आहे.

राज उर्फ मंगलू राजकुमार पांडे (वय १५) असे मृत मुलाचे नाव असून तो एमआयडीसी परिसरातील आझादनगरात राहत होता. त्याचे वडील एका कंपनीत काम करतात. कुटुंबात आई तसेच एक भाऊ आणि एक बहिण तसेच काका आणि त्यांचा परिवार आहे. आरोपी शाहूच्या कुटुंबात आई आणि त्याच्यासह चार भाऊ आहेत. त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून तो फॅब्रिकेटिंगची कामे करतो. तो रायसोनी कॉलेजच्या मागे राहतो. आझादरनगर परिसरात राहणाऱ्या एका मुलीवर त्याचे एकतर्फी प्रेम होते. ते लक्षात आल्यानंतर राज पांडेच्या काकांनी आरोपी शाहूचा पानउतारा केला. मुलीच्या मागे लागल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकीही दिली होती. त्यानंतर मुलीचे लग्न झाले. त्यामुळे आरोपी शाहू राजच्या काकांवर चिडून होता. त्यांच्यावर सूड उगविण्याची तो संधी शोधत होता. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास १५ वर्षीय राज एसआरपीएफच्या ग्राउंडजवळ दिसताच शाहू त्याच्याजवळ गेला. राजला क्रिकेट सामने सुरू असून आपण खेळायला जाऊ असे म्हणून सोबत घेतले. त्याला तो थेट हुडकेश्वर मधील वंजारी कॉलेजजवळच्या एका निर्जन ठिकाणी नेले. दुचाकीवरून उतरून तो त्याला एका लेआऊटकडे घेऊन गेला. तोवर अंधार पडायला सुरुवात झाली होती. ईकडे कुठे क्रिकेटचे ग्राऊंड दिसत नसल्याने राजने आरोपीला भीती वाटत असल्याचे सांगून परत चलण्याचा हट्ट धरला. राजने त्याला समोर केले अन् मागून एक दगड उचलून त्याच्या डोक्यात घातला. राज खाली पडताच नंतर त्याला आरोपी शाहूने निर्घृणपणे दगडाने ठेचले. त्यानंतर ब्लेडने त्याच्या हाताच्या नस कापून त्याची हत्या केली.

वेळ गमावला, चूक भोवलीराजचे अपहरण करून त्याला निर्जन ठिकाणी नेल्यानंतर ६.२७ वाजता आरोपीने एका ठिकाणी दुचाकी थांबवली. त्याने राजच्या कुटुंबीयांना फोन केला. राजचे अपहरण केले असून तो सुखरूप पाहिजे असेल तर त्याच्या काकाचे शिर (मुंडके) कापून व्हॉटस्अॅपवर फोटो पाठवा, असे आरोपी म्हणाला. अपहरण झाल्याचे आणि अपहरण करणारा माहित असूनही अपहरणकर्त्यां शाहूने राजच्या पालकांकडे भयानक मागणी करूनही ते त्याची समजूत काढत बसले. तो वारंवार फोन करत होता. मात्र, पांडे कुटंबीयांनी तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे टाळले. दरम्यान, रात्री ९ च्या सुमारास पांडे कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलिसांना ते कळविले. अपहरणाचे वृत्त आणि त्याची भयंकर मागणी ऐकून ठाणेदार युवराज हांडे यांनी लगेच वरिष्ठांना कळविले. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. दिलीप झळके, उपायुक्त नुरूल हसन एमआयडीसीत दाखल झाले. त्यांनी आरोपीला शोधण्यासाठी शहर पोलिस दलातील प्रचंड ताफा कामी लावला. मध्यरात्री आरोपी शाहू बोरखेडीजवळ (बुटीबोरी) पोलिसांच्या हाती लागला.

अनेकांच्या काळजाचे पाणी

त्याला खाक्या दाखविताच त्याने राजच्या हत्येची कबुली दिली. नंतर त्याने पोलिसांना घटनास्थळ दाखवले. राज वंजारी कॉलेजजवळच्या निर्जन परिसरातून पहाटे २ ते ३ च्या सुमारास पोलिसांनी राजचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह ताब्यात घेतला. विच्छेदनानंतर राजचा मृतदेह त्याच्या घरी नेला तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. यावेळी तेथे शोकसंतप्त नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती. पांडे कुटुंबीयांचा आक्रोश अनेकांच्या काळजाचे पाणी करणारा होता.

 

आयेंगी याद मेरी वफाये ... कभी मुझे भूल ना पाओंगे... राज पांडेचा व्हिडीओ व्हायरल 

नराधम सूरज शाहूच्या निर्दयेतला बळी पडलेल्या राज उर्फ मंगलू राजकुमार पांडे या निष्पाप मुलाची अंत्ययात्रा निघाली अन् त्याच्या गाण्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओने अनेकांच्या पापण्या ओल्या केल्या. राजला त्याचे आप्तस्वकिय मंगलू नावानेच हाक देत होते. अवघा १५ वर्षांचा मंगलू चांगला गायक होता. तो खड्या आवाजात गात होता. काही दिवसांपूर्वी त्याने ‘आयेंगी याद... मेरी वफाये ... कभी मुझे भूल ना पाओंगे,

करोंगे फरियाद रो... रो... के तूम .... किसीको बता नही पाओंगे’ हे गीत गायले. त्याच्या गाण्याचा मित्रांनी व्हिडीओ बनविला. यावेळी त्याच्या गाण्याचे शब्द प्रत्यक्षात उतरेल, अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. राजचा मृतदेह घरी पोहचल्यानंतर दोनदा त्याची आई आणि काकू बेशुद्ध पडली. पुरूष मंडळी कसाबसे आपले हुंदके रोखत होती. त्याची अंत्ययात्रा निघाली तेव्हा त्याच्या मित्रांनी त्याचा हा व्हिडीओ व्हायरल केला अन् अनेक जण अक्षरशा ओक्सोबोक्सी रडू लागले. दरम्यान, निरागस राजचा बळी घेणाऱ्या आरोपी सूरज शाहूला तातडीने फासावर टांगा, अशी मागणी करत राजचे नातेवाईक टाहो फोडत होते. 

टॅग्स :KidnappingअपहरणDeathमृत्यूPoliceपोलिसnagpurनागपूरArrestअटक