शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

प्रियकरासोबत पलायन केलेल्या भाचीला १९ महिन्यांनी पाहून मामा ढसाढसा रडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 16:25 IST

Crime News : तीन महिन्यापासून शहरात वास्तव्य : पोलीस व नातेवाईकांनी ठेवले होते बक्षीस

जळगाव - प्रेमप्रकरणातून प्रियकरासोबत नागपूर येथून पलायन केलेल्या १९ महिन्यानंतर सापडलेल्या भाचीला पाहून मामा ढसाढसा रडला तर ज्या पोलिसांमुळे भाचीचा शोध लागला, त्या पोलिसांसमोरही आभाराला शब्द नाहीत असे म्हणत अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. भाचीची अवस्था व मामाची तळमळ पाहता तपास कामातील पोलिसांनाही गहिवरुन आले. हा प्रसंग शुक्रवारी सकाळी कालिंका माता मंदिर परिसर व स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात घडला. या प्रेमीयुगुलाला घेऊन नागपूर पोलीस व मामा परतीच्या प्रवासाला निघाले.

या घटनेबाबत माहिती अशी की, नागपूर येथील २० वर्षीय तरुण व २० वर्षीय तरुणी यांनी प्रेमप्रकरणातून २० मे २०१९ रोजी घरातून पलायन केले. दोघांबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे. अधिकच्या चौकशीत दोघही पदवीच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत असून ११ पासून एकाच ठिकाणी शिकवणीला असताना दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरु झाले. दोघंही वेगवेगळ्या समाजाचे असल्याने लग्नाला विरोध होऊ शकतो, या शक्यतेने घरातून पलायन केल्याचे उघड झाले. स्थानिक पोलिसांनी अनेक ठिकाणी चौकशी केली, मात्र त्यात त्यांना अपयश आले होते. तरुणीची आई व मामांनी तत्कालिन पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांची भेट घेतली, आईची अवस्था पाहता उपाध्याय यांनी पुन्हा यंत्रणा कामाला लावली, परंतु तेव्हाही अपयश आले. शेवटी या दोघांची माहिती देणाऱ्याला पाच हजाराचे बक्षीस दिले जाईल, असे पोलिसांना जाहीर करावे लागले. दीड वर्ष झाले तरी शोध लागत नसल्याने तरुणीच्या आईची प्रकृती खालावली. काही अनुचित घटना तर घडली नसावी ना? असा प्रश्न घोंगावत होता.दर महिन्याला बदलवले घरहे प्रेमीयुगुल तीन महिन्यापासून कालिंका माता मंदिर परिसरात वास्तव्याला होते. त्याआधी ते हिंगाणा, ता. यावल येथे वास्तव्याला होते. दर महिन्याला घर बदल करीत असल्याने त्यांच्याविषयी रहिवाशांना शंका आली. त्यांच्यातील एका जणाने थेट स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना माहिती दिली. याची खातरजमा करण्यासाठी बकाले यांनी हवालदार शरद भालेराव व नरेंद्र वारुळे यांना पाठविले असता त्यात तथ्य आढळून आले. गोपनीय माहिती काढून त्यांच्याविषयी नागपूर पोलिसात काही गुन्हा दाखल आहे का? याची चौकशी केली असता हुळकेश्वर पोलीस ठाण्यात मुलगी हरविल्याची नोंद असून तिच्या शोधासाठी पोलिसांनी बक्षिस जाहिर केल्याची माहिती प्राप्त झाली. मुलगा, मुलगी जळगावात असल्याचे समजताच तेथील हवालदार नथ्थू ढोबळे, महिला कर्मचारी अनिता धुर्वे व मुलीचा मामा असे गुरुवारी रात्री जळगावकडे निघाले. घर पाहून मामा हतबल..या घटनेतील तरुणीचा मामा महावितरण कंपनीत वर्ग १ चा अधिकारी आहे. शुक्रवारी सकाळी कालिंका माता चौक परिसरात भाचीचे घर पाहून तो जागेवरच हतबल झाला.तरुणीच्या वडीलांचे निधन झालेले आहे, तिच्या आईची अवस्था पाहता मामा भाचीला पाहून ढसाढसा रडू लागला. स्थानिक पोलिसांनी दोघांना शनी पेठ पोलीस ठाण्यात नेले. तेथे नोंद करुन त्यांचा ताबा घेतला.  तेथून हे सर्व जण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बकाले यांच्याकडे आले. तुमच्यामुळे माझी भाजी सुखरुप मिळाली असे म्हणत मामाने हुंदके देत अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. दरम्यान, सकाळी ९ वाजता प्रेमीयुगुलाला घेऊन पोलीस नागपूरला रवाना झाले. 

टॅग्स :Missingबेपत्ता होणंJalgaonजळगावPoliceपोलिस