पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील गहलेवाला गावात घरगुती वादातून काकाने आपल्या लष्करात सैनिक म्हणून काम करणाऱ्या पुतण्याला गोळ्या घालून ठार मारले. पहिली गोळी पुतण्याच्या छातीवर तर दुसरी गोळी त्याच्या डोक्याला लागली आहे. शुक्रवारी दुपारी गहलेवाला गावात ही घटना घडली. दुसरीकडे पोलिसांनी आरोपी काकाविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.घुबया पोलिस चौकी प्रभारी एएसआय सुरेंद्र निखंज यांनी सांगितले की, सैनिक असलेला संदीप सिंह (वय 23) रा. गहलेवाला एका महिन्याच्या सुट्टीवर घरी आला होता. काकूच्या कुटुंबासोबत त्याचा खटला सुरु होता. संदीप या प्रकरणात काका देसा सिंगची मदत मागत होता आणि काकूला त्याच्या करारावर स्वाक्षरी करण्यास सांगत होता.
१ महिन्याची सुट्टी घेऊन आलेल्या सैनिक पुतण्यावर काकाने झाडल्या गोळ्या; समोर आलं धक्कादायक कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 17:11 IST
Uncle Shot death Soldier Nephew : दुसरीकडे पोलिसांनी आरोपी काकाविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
१ महिन्याची सुट्टी घेऊन आलेल्या सैनिक पुतण्यावर काकाने झाडल्या गोळ्या; समोर आलं धक्कादायक कारण
ठळक मुद्देपहिली गोळी त्याच्या छातीवर तर दुसरी गोळी डोक्याला लागली आणि त्याचा मृत्यू झाला.