शेतीच्या वादातून पुतण्याने केला काकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 20:48 IST2021-06-06T20:47:53+5:302021-06-06T20:48:12+5:30

Crime News : शेतीच्या वादातून पुतण्याने केला काकाचा खून

Uncle murdered by nephew over agricultural dispute | शेतीच्या वादातून पुतण्याने केला काकाचा खून

शेतीच्या वादातून पुतण्याने केला काकाचा खून

बोरी अडगाव : शेतीच्या वादातून पुतण्याने काकाचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून केल्याची घटना खामगाव तालुक्यातील आकोली शिवारात
रविवारी दुपारी घडली. मृतक रमेश नरिभाऊ तिडके (वय-७०) ये तालुक्यातील अटाळी येथील रहिवासी आहेत. याबाबत हिवरखेड पोलीस ठाण्यात संशयित आरोपी पुतण्या पंकज सुरेश तिडके (वय-३५) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटाळी येथील रमेश तिडके यांची तालुक्यातील आकोली शिवारात शेती आहे. या शेतीच्या वादाबाबत काका-पुतण्यांनी परस्परविरोधी तक्रारीही खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात केल्या आहेत. दरम्यान, रविवारी दुपारी शेतात असलेल्या रमेश तिडके यांच्यावर कुऱ््हाडीने प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच हिवरखेडचे ठाणेदार ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आला. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी मृतकाच्या मुलाच्या बयाणावरून फिर्याद नोंदवणे सुरू होते. तक्रारीवरून आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले. पुढील तपास हिवरखेड पोलिस करीत आहेत.

Web Title: Uncle murdered by nephew over agricultural dispute