काकानं भाचीवर केलेल्या दुष्कृत्याचा व्हिडीओ व्हायरल; सहा वर्षांपर्यंत केलं ब्लॅकमेल 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 09:19 AM2019-11-21T09:19:49+5:302019-11-21T09:21:29+5:30

दिल्लीतल्या भजनपुरा भागात एक लाजिरवाणं कृत्य घडलं आहे.

uncle molested niece made video blackmailed victim in delhi bhajanpura | काकानं भाचीवर केलेल्या दुष्कृत्याचा व्हिडीओ व्हायरल; सहा वर्षांपर्यंत केलं ब्लॅकमेल 

काकानं भाचीवर केलेल्या दुष्कृत्याचा व्हिडीओ व्हायरल; सहा वर्षांपर्यंत केलं ब्लॅकमेल 

Next

नवी दिल्ली- दिल्लीतल्या भजनपुरा भागात एक लाजिरवाणं कृत्य घडलं आहे. काकानं 26 वर्षांच्या भाचीबरोबर दुष्कृत्य केल्याचं समोर आलं आहे. एवढ्यावरच न थांबता त्या नराधम काकानं पीडितेचा अश्लील व्हिडीओही तयार केला. या व्हिडीओच्या माध्यमातून तो पीडितेला ब्लॅकमेल करून तिचा वारंवार शारीरिक छळ करत होता. तो नराधम व्हिडीओ दाखवून तिच्यावर पाच ते सहा वर्षांपर्यंत लागोपाठ अत्याचार करत राहिला. काकाच्या शारीरिक छळाला कंटाळून अखेर पीडितेनं या दुष्कृत्याला वाचा फोडली आणि सर्व घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी या प्रकाराची तक्रार पोलीस ठाण्यात दिली.
  
पोलिसांनी तपासानंतर 49 वर्षीय आरोपी असलेल्या काकाला अटक केली. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केला असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. आरोपीनं आपण आपचा सदस्य असल्याचं सांगितलं. परंतु आम आदमी पार्टीनं आरोपीचा आमच्याशी काहीही संबंध नसल्याचं सांगितलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 26 वर्षीय पीडिता कुटुंबीयांसह भजनपुरा भागात राहते. तर आरोपी काका स्वतःच्या कुटुंबीयांसह सीलमपूरमध्ये राहतो.

आरोपीचे पीडितेच्या घरी ये-जा होते. पाच ते सहा वर्षांपूर्वी पीडितेला फिरायला नेण्याच्या बहाण्यानं तो एका हॉटेलवर घेऊन गेला आणि तिकडेच त्यानं तिच्याबरोबर दुष्कृत्य केलं. त्याचदरम्यान त्याचा अश्लील व्हिडीओसुद्धा तयार केला. या प्रकारानंतर आरोपी वारंवार पीडितेला ब्लॅकमेल करून तिच्यावर जोरजबरदस्ती करू लागला. हा त्रास असह्य झाल्यानं पीडितेनं घडलेली हकीकत कुटुंबीयांना सांगितली, त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली, पोलिसांनी त्या नराधमाला अटक केली. 

Web Title: uncle molested niece made video blackmailed victim in delhi bhajanpura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.