मध्यप्रदेशातील उज्जैनमध्ये एका महिलेने आधी आपल्या सासूला शिवीगाळ केली आणि त्यानंतर विटेने तिच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जेव्हा पतीने तिला समजवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या महिलेने पतीवरही जीवघेणा हल्ला केला. या घटनेनंतर महिला फरार झाली आहे. सासूने फक्त 'गहू साफ कर' असं सांगितल्याने सून संतापली होती आणि वादाला सुरुवात झाली.
चिंतामण पोलीस ठाणे हद्दीतील राणाबड गावात ही भयानक घटना घडली आहे. जितेंद्र बागवान याची पत्नी तन्नू हिला तिची सासू शांतीबाई यांनी गहू साफ करण्यास सांगितलं होतं. मात्र तन्नूला सासूने सांगितलेलं काम आवडलं नाही. तिने यावरून सासूशी वाद घालण्यास आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पाहता पाहता हा वाद इतका विकोपाला गेला की, तन्नूने विटेने सासूवर हल्ला केला.
पतीने समजवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या हाताला चावा घेतला या हल्ल्यात शांतीबाई गंभीर जखमी झाल्या आहेत. शांतीबाईंनी जेव्हा ही माहिती आपला मुलगा जितेंद्रला दिली, तेव्हा त्याने तन्नूला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र पतीने मध्यस्थी केल्यावर वाद कमी होण्याऐवजी आणखी वाढला. चिंतामण पोलीस ठाण्यात जितेंद्रने दिलेल्या तक्रारीवरून तन्नूविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे, मात्र ती अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही.
जखमी झालेल्या शांतिबाई आणि जितेंद्र यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं, तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. जितेंद्रने पोलिसांत तक्रार करताना सांगितलं की, तन्नू नेहमीच त्याला मारहाण करते आणि तिला त्याला मारायचं आहे. आईला मारहाण केल्याबद्दल तो फक्त तिला समजवत होता, पण गहू साफ करण्याच्या छोट्याशा गोष्टीवरून तिने मोठा गोंधळ घातला की शेवटी पोलिसांत धाव घ्यावी लागली.