माणुसकीला काळीमा! भरदिवसा फुटपाथवर महिलेवर बलात्कार; लोक बनवत राहिले Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 14:55 IST2024-09-06T14:46:38+5:302024-09-06T14:55:26+5:30
भरदिवसा झालेल्या बलात्काराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

माणुसकीला काळीमा! भरदिवसा फुटपाथवर महिलेवर बलात्कार; लोक बनवत राहिले Video
मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. भरदिवसा झालेल्या बलात्काराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. हा व्हिडीओ कोयला फाटक भागातील आहे. या व्हिडीओवरून राजकारण तापलं आहे. काँग्रेसचे नेतेही आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
उज्जैनच्या कोयला फाटक परिसरात एका महिलेवर झालेल्या बलात्काराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ दुपारचा आहे. रस्त्यावर एका तरुणाकडून तरुणीवर बलात्कार करण्यात आला आहे. महिलेला मदत करण्याऐवजी लोक व्हिडीओ बनवण्यात व्यस्त असलेले पाहायला मिळत आहेत.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच काँग्रेस नेत्यांनी भाजपा सरकारवर जोरदार आरोप करण्यास सुरुवात केली. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जितू पटवारी यांनी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
उज्जैन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस अधीक्षक प्रदीप शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी महिलेकडून कोणतीही तक्रार आलेली नाही, मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेतली आहे.