उज्जैन बलात्कार प्रकरणातील आरोपीचा पळण्याचा प्रयत्न; पोलिसांशी झटापटीत जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2023 23:50 IST2023-09-28T23:27:10+5:302023-09-28T23:50:09+5:30
जखमी झाल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. तसेच चौकशीसाठी ३ अन्य लोकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

उज्जैन बलात्कार प्रकरणातील आरोपीचा पळण्याचा प्रयत्न; पोलिसांशी झटापटीत जखमी
उज्जैन बलात्कार प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी पकडले आहे. त्याला घटनास्थळी नेले असता पोलिसांची नजर चुकवून त्याने पलायन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत आरोपी आणि दोन पोलीस जखमी झाले आहेत.
आरोपी पळत असताना त्याचा तोल गेला आणि तो जमिनीवर पडला. यामुळे त्याला दुखापत झाली आहे. १२ वर्षांच्या शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपातून पोलिसांनी एका रिक्षा चालकाला अटक केली आहे. भारत सोनी असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी पुरावे गोळा करण्यासाठी त्याला बलात्कार केला त्या ठिकाणी नेले होते. तेव्हा त्याने पोलिस अन्य कामांत व्यस्त असल्याचे पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
जखमी झाल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. तसेच चौकशीसाठी ३ अन्य लोकांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीला सायबर क्राईम टीमच्या मदतीने पकडण्यात आले आहे. तो पळून जात असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. यावेळी त्याला पकडण्याच्या प्रयत्नात धक्काबुक्की झाली, यात तो पडल्याचे महाकाल पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर अजय वर्मा यांनी सांगितले. या दरम्यान दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत.