भिवंडीत दोन तरुणांवर अज्ञातांचा गोळीबार, हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल

By नितीन पंडित | Updated: October 14, 2023 22:04 IST2023-10-14T22:03:54+5:302023-10-14T22:04:02+5:30

फिरोज रफिक शेख (२७) व अजीम अस्लम सय्यद (३०) अशी दोघांची नावे

Two youths shot at by unknown persons in Bhiwandi, a case has been registered against the assailants | भिवंडीत दोन तरुणांवर अज्ञातांचा गोळीबार, हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल

भिवंडीत दोन तरुणांवर अज्ञातांचा गोळीबार, हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: तालुक्यातील अंबाडी वाशिंद रस्त्यावर मैंदे गावाच्या हद्दीत शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दुचाकी वरून जात असलेल्या दोघा जणांवर त्यांचा पाठलाग करणाऱ्या दुचाकी वरील अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे.या गोळीबारात दोघे जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर सायन मुंबई रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आले असून पडघा पोलिस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिरोज रफिक शेख वय २७ वर्ष व अजीम अस्लम सय्यद वय ३० वर्ष दोघे रा.चंदनसार,विरार पूर्व अशी जखमींचे नाव आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार जखमींचा पाठलाग करणारे या दोघांच्या पाळतीवर पाठलाग करीत आले होते.घटनास्थळावर आरोपी हा लाल रंगाच्या सीबीझेड दुचाकी वरून तोंडावर मास्क लावून आले होते.त्यांनी केलेल्या सहा राऊंड फायर पैकी तीन गोळ्या दोघांना लागल्या आहेत.या गोळीबाराच्या घटने नंतर हल्लेखोर आपली दुचाकी तेथेच सोडून पळून गेले आहेत.हा गोळीबार नेमका कोणी व कोणत्या कारणा वरून केला आहे याची अजून माहिती स्पष्ट होत नसून पोलिस विभागा कडून ही याबाबत गोपनीयता बाळगली जात आहे.या प्रकरणी पडघा पोलिस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरां विरोधात गुन्हा दाखल केला करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Two youths shot at by unknown persons in Bhiwandi, a case has been registered against the assailants