एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 14:26 IST2025-08-06T14:26:35+5:302025-08-06T14:26:53+5:30

युवतीने तिच्यासोबत घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला मात्र पोलिसांनी यावर गुन्हा दाखल केला नाही असा दावा युवतीने केला आहे.

Two youths harassment a young woman in Kanpur, Uttar Pradesh | एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...

एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...

कानपूर - उत्तर प्रदेशातील कानपूर येथे गर्लफ्रेंड तिच्या बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली होती. हे दोघे एकत्र एका ठिकाणी बसले होते. त्यावेळी २ युवकांनी त्यांचा व्हिडिओ बनवला. त्यानंतर हा पाठीमागून आलेल्या २ युवकांनी जोडप्याला व्हिडिओ दाखवून तुमच्या घरी दाखवतो अशी धमकी दिली. त्यावर जोडपे घाबरले, त्यांनी तुम्ही असं करू नका असं सांगितले. तेव्हा युवकांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यानंतर दोघे युवक मुलीसोबत गैरवर्तवणूक करू लागले. 

युवक मुलीची छेड काढत असताना बॉयफ्रेंड तिला एकटे सोडून पळून गेला. मुलीला वाचवण्याचा प्रयत्नही त्याने केला नाही. आरोपी युवकांनी युवतीवर बळजबरी करत तिच्यावर गँगरेप केला. या घटनेची तक्रार पोलिसांना देण्यात आली आहे. सध्या पोलीस याचा तपास करत आहेत. युवतीने म्हटलं की, २६ जुलैला मी प्रियकराला भेटण्यासाठी गेली होती. महराजपूरच्या एका निर्जन स्थळी आम्ही एकत्र बसलो होतो. त्यावेळी २ युवकांनी आमचा व्हिडिओ बनवला. त्यांनी ब्लॅकमेलिंग करत आमच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी प्रियकर घाबरला आणि संधी मिळताच तिथून पळून गेला.

प्रियकर पळाल्यानंतर २ युवकांच्या तावडीत एकटी मुलगी सापडली. त्यांनी तिच्याकडे पैशांची मागणी केली. जेव्हा मुलीने तिच्याकडे पैसे नाहीत असं सांगितले तेव्हा तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला. या दोन्ही युवकांनी युवतीच्या नाकातील दागिनाही हिसकावून घेतला असा आरोप झाला आहे. युवतीने तिच्यासोबत घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला मात्र पोलिसांनी यावर गुन्हा दाखल केला नाही असा दावा युवतीने केला आहे.

दरम्यान, या प्रकरणी युवतीने पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतली तेव्हा वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. युवतीवर सामुहिक बलात्कार केल्याचा आरोप २ युवकांवर आहे. सध्या पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची २ पथके तयार करण्यात आली आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस तपास सुरू आहे. लवकरच आरोपीना अटक करू असं आश्वासन पोलिसांनी दिले आहे.
 

Web Title: Two youths harassment a young woman in Kanpur, Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.