सहलीसाठी आलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांनी चोरला मोबाईल, संशयितांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 20:19 IST2019-12-23T20:12:28+5:302019-12-23T20:19:30+5:30
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.

सहलीसाठी आलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांनी चोरला मोबाईल, संशयितांना अटक
मडगाव - गोव्यात पर्यटक म्हणून आलेल्या महाराष्ट्रातील दोन जणांनी एकाचा कॅमेरा पळविण्याची घटना उघडकीस आली असून, गोव्यातील कोकण रेल्वे पोलिसांनी संशयितांना अटक करुन त्यांच्याकडून चोरीला गेलेला माल जप्त केला आहे. कल्पेश पवार व साहिल खान अशी संशयितांची नावे असून, ते दोघेही महाराष्ट्रातील अहमदनगर येथील आहेत. भारतीय दंड संहितेच्या ३७९ कलमाखाली पोलिसांनी या दोघा संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.
प्रिती रोबिंद्रनाथ बिश्वास या तक्रारदार आहेत. त्यांनी जनशताब्दी एक्सप्रेस रेल्वेचे तिकीट काढले होते. मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकावर संशयितांनी तिचा मोबाईल पळविला. मागाहून या प्रकरणी कोकण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार नोंद झाल्यानंतर पोलिसांनी संशयितांचा माग काढून त्यांना अटक केली.