Two thieves who broke mobile shop were caught red-handed | मोबाईल शॉपी फोडणाऱ्या दोन चोरट्यांना गुन्हेशाखेने पकडले

मोबाईल शॉपी फोडणाऱ्या दोन चोरट्यांना गुन्हेशाखेने पकडले

औरंगाबाद : सिडकोतील कॅनाट मार्केट मधील मोबाईल शॉपी फोडून सुमारे दिड लाखाचे मोबाईल पळविणाऱ्या चोरट्यांना पकडण्यात गुन्हेशाखेला यश आले . अटकेतील दोन आरोपीकडून ६५ हजार रुपये किमतीचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले .

अनिल सोमीनाथ शिंदे (२२, रा जिकठाण , ता . गंगापूर) आणि सोमनाथ दामू जाधव (रा . जटवाडा ) अशी अटकेतील आरोपीची नावे आहेत . याविषयी अधिक माहिती अशी की, सिडकोतील कॅनाट मार्केट मधील मोबाईल शॉपी चे शटर उचकटुन चोरट्यानी सुमारे दिड लाखाचे मोबाईल चोरून नेले होते  . याविषयी मीर असलम बेग यांनी सिडको ठाण्यात २१ मे रोजी तक्रार नोंदविली होती . या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल आणि त्यांच्या पथकातील कर्मचारी शिवाजी झिने , प्रकाश चव्हाण , राजेंद्र साळुंके , नितीन देशमुख ,प्रभाकर राऊत , संजय जाधव आणि चालक न्यानेश्वर पवार हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनखाली तपास करीत  होते . 

दरम्यान आमखास मैदान येथे दोन संशयित व्यक्ती महागडे मोबाईल स्वस्तात विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत आहे ,  अशी माहिती खबऱ्याने  पथकाला दिली . यानंतर पोलिसांनी आमखास मैदान येथे जाऊन संशयितांना ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली . त्यावेळी आरोपीजवळील बॅगेत महागडे ६५ हजाराचे मोबाईल हॅण्डसेट आढळले . याविषयी पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली . पोलिसांनी खाक्या दाखविताच आरोपीनी गुंह्या ची कबुली देत कॅनाट मध्ये २० मे च्या रात्री अन्य एका साथीदारसह मोबाईल शॉपी फोडल्याचे सांगितले . या दुकानाचे शटर उचकटुन चोरले्ल्या मोबाईल पैकी हे मोबाईल आहे . उर्वरित मोबाईल त्यांच्या अन्य साथीदारांजवळ असल्याचे त्यांनी नमूद केले . पोलिसांनी ६५ हजाराचे मोबाईल जप्त करून आरोपीना अटक केली .

Web Title: Two thieves who broke mobile shop were caught red-handed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.