Two suspects arrested for murder with sharp weapon outside of Bar | बारबाहेर तरुणाची शस्त्राने सपासप वार करून हत्या, दोन संशयितांना अटक

बारबाहेर तरुणाची शस्त्राने सपासप वार करून हत्या, दोन संशयितांना अटक

ठळक मुद्देलपून बसलेल्या 7 ते 8 जणांच्या टोळक्याने दिपकला मारण्यासाठी धारदार शस्त्रासह त्याच्या पाठीमागे धावले. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली

उल्हासनगर -  धीरू बारमध्ये झालेल्या क्षुल्लक वादातून ७ ते ८ जणांच्या टोळक्याने मध्यरात्री अड्डीच वाजण्याच्या दरम्यान दीपक भोईर याचा बारसमोर धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली. याबाबत उल्हासनगरपोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.


उल्हासनगर कॅम्प नं 3 नेहरू चौकात धीरूबार असून बारमध्ये दीपक भोईर मित्रासमावेत सोमवारी रात्री गेला होता. तेथे क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यावर तो बारमधून बाहेर पडला. त्यावेळी लपून बसलेल्या 7 ते 8 जणांच्या टोळक्याने दिपकला मारण्यासाठी धारदार शस्त्रासह त्याच्या पाठीमागे धावले. जीव मुठीत घेऊन धावणारा दीपक खाली पडताच पाठलाग करणाऱ्या टोळक्यांनी त्याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिपकला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकाराने शहरासह दीपक भोईर राहत असलेल्या माणेरेगाव परिसरात खळबळ उडाली. मुख्य आरोपी नरेश उर्फ बबल्या याच्यासह सहकाऱ्यांना अटक होत नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा सुरवातीला कुटुंबासह नातेवाईकांनी घेतल्याने मोठा पेचप्रसंग उल्हासनगर पोलिसांसमोर उभा टाकला होता.

उल्हासनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोन संशयितांना अटक केल्याची माहिती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जावळे यांनी दिली. तसेच संशयीत आरोपीच्या मागे पोलीस पथक असल्याचे संकेत दिले. दरम्यान शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे कारण पुढे करून शिवसेनेच्या उल्हासनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोन संशयितांना अटक केल्याची माहिती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जावळे यांनी दिली. तसेच संशयीत आरोपीच्या मागे पोलीस पथक असल्याचे संकेत दिले. दरम्यान शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे कारण पुढे करून शिवसेनेच्या नगरसेविका वसुधा बोडारे व ज्योत्स्ना जाधव यांनी महापालिका महासभेत शहर दारूबंदीचा ठराव आणला. सर्वपक्षीय नगरसेवकांनी सदर ठराव  बहुमताने मंजूर केल्यावर शहरातील गुन्हेगारी ऐरणीवर आली. तसेच गृहमंत्री यांना याबाबत निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. यासर्व प्रकारानंतर गुन्हेगारीची संख्या कमी झाली नाही. काही वर्षांपूर्वी धीरू बारबाहेर दोन गटातील वादातून कुकरेजा नावाच्या तरुणांची हत्या होऊन शिवसेनेच्या माजी नगरसेवकासह हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. तसेच हाणामारीचे प्रकार येथे सुरूच असतात.

शहरात गावठी दारु, अंमली पदार्थाची विक्री, हुक्का पार्लर आदींच्या अनैतिक धंद्याचा महापूर आला आहे. यातूनच गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे  बोलले जात आहे.  तसेच रात्रभर सुरू असणाऱ्या बार, डान्स बार, महिला बार, हुक्का पार्लर सुरू असल्याने गुन्हेगारी वाढल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Web Title: Two suspects arrested for murder with sharp weapon outside of Bar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.