मुंबईतील शिवाजीनगरमध्ये दुमजली घर कोसळले; 4 मृत्यू, 14 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 09:15 PM2021-07-23T21:15:51+5:302021-07-23T21:16:04+5:30

Mumbai Rain Update: मोहम्मद परवेज मोहम्मद जाबीर शेख यांचे अहिल्याबाई होळकर रोडवर दोन मजल्यांचे घर होते. ते कोसळल्याने परवेज यांचे वडील जाबीर रेहमतुला शेख (80), मुलगी नेहा उर्फ मुशिरा मोहमद परवेज शेख (24) आणि परहीन परवेझ शेख (20), पत्नी शमशाद बेगम (50) यांचा मृत्यू झाला आहे. 

Two-storey house collapses in Shivajinagar, Mumbai; 4 killed, 14 injured | मुंबईतील शिवाजीनगरमध्ये दुमजली घर कोसळले; 4 मृत्यू, 14 जखमी

मुंबईतील शिवाजीनगरमध्ये दुमजली घर कोसळले; 4 मृत्यू, 14 जखमी

Next

मुसळधार पावसामुळे मुंबईत दरड कोसळल्याच्या घटना ताज्या असताना आज शिवाजी नगर पोलिस ठाणे हद्दीतील बॉम्बे सिटी हॉस्पिटलच्या मागे दुमजली घर कोसळून 4 जण ठार झाले आहेत. तर 14 जण जखमी झाले आहेत. (two story home collapsed in Mumbai, 4 killed, 12 injured.)

मोहम्मद परवेज मोहम्मद जाबीर शेख यांचे अहिल्याबाई होळकर रोडवर दोन मजल्यांचे घर होते. ते कोसळल्याने परवेज यांचे वडील जाबीर रेहमतुला शेख (80), मुलगी नेहा उर्फ मुशिरा मोहमद परवेज शेख (24) आणि परहीन परवेझ शेख (20), पत्नी शमशाद बेगम (50) यांचा मृत्यू झाला आहे. 
तर 14 जखमींवर राजावाडी, सायन, बॉम्बे सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तर या घराच्या बाजुच्या दोन घरांना तडे गेल्याने ती घरेदेखील पाडण्यात आली आहेत. 

Web Title: Two-storey house collapses in Shivajinagar, Mumbai; 4 killed, 14 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app