Corona Virus Remdesivir: रेमडीसीव्हरचा काळा बाजार करणारे दोघे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 17:33 IST2021-04-10T17:33:42+5:302021-04-10T17:33:55+5:30
21 Remdesivir Drug caught in thane black market: कोरोना रुग्णांसाठी रेमडीसीव्हर हे गरजेचे औषध आहे. परंतु सध्या राज्यात त्याचा तुटवडा जाणवत आहे. तर काही ठिकाणी त्याचा काळाबाजार सुरु आहे. ठाण्यात २१ रेमडीसीव्हर हस्तगत.

Corona Virus Remdesivir: रेमडीसीव्हरचा काळा बाजार करणारे दोघे अटकेत
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोरोना रुग्णांसाठी रेमडीसीव्हर हे गरजेचे औषध आहे. परंतु सध्या राज्यात त्याचा तुटवडा जाणवत आहे. तर काही ठिकाणी त्याचा काळाबाजार सुरु आहे. अशाच प्रकारे ठाण्यात रेमडीसीव्हरचा काळा बाजार करणाऱ्यासाठी तीनहात नाका, इंटरनिटी मॉल येथे काही जण येणार असल्याची माहिती ठाणो खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचुन एका इसमास रंगहात पकडले आहे. या व्यक्तीकडून एक इंजेक्शन ५ ते १० हजार रुपयांना विकले जात होते. त्यानुसार त्याच्याकडून १६ इंजेक्शन ताब्यात घेण्यात आली आहेत. तर बाळकुम नाका येथून देखील अन्य एकास ५ इंजेक्शसह ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आतीफ परोग अंजुम (२२) रा. कुर्ला मुंबई आणि प्रमोद ठाकुर (३१) रा. ठाकुरपाडा, भिंवडी अशी आहेत. १० एप्रिल रोजी तीन हात नाका आणि बाळकुम येथे दोघे रेमडीसीव्हरची इंजेक्शन घेऊन येणार असल्याची माहिती ठाणो खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार तीन हात नाका आणि बाळकुम येथे सापळा रचून या दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही रेमडीसीव्हर ५ ते १० हजारांना विकत असल्याची माहिती देखील आता समोर आली आहे. त्या दोघांकडून पोलिसांनी अनुक्रमे १६ आणि ५ अशी २१ रेमडीसीव्हरची इंजेक्शन ताब्यात घेण्यात आल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाने दिली.
पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांच्यासह इतर प्रमुख अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने केली. दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या विरोधात जीवनावश्यक वस्तु अधिनियम १९९५ चे उल्लघंन, दंडनिय कलम ७ (१) (ए) कलम १८ - बी व कलम २२ (१) (सीसीए), औषध प्रसाधन कायदा १९४० चे कलम १८ (सी) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.