दोन बहिणींचे अपहरण करून सामूहिक बलात्कार, बेशुद्ध अवस्थेत डोंगराळ परिसरात आढळल्या दोघी
By पूनम अपराज | Updated: October 19, 2020 20:03 IST2020-10-19T20:02:53+5:302020-10-19T20:03:46+5:30
Gangrape : सामूहिक बलात्कारानंतर आरोपींनी दोघींना जसवंतपुरा पोलीस ठाणे हद्दीतील राजपुरा येथील सुंधामाता डोंगराळ परिसरात बेशुद्ध अवस्थेत सोडून पळ काढला.

दोन बहिणींचे अपहरण करून सामूहिक बलात्कार, बेशुद्ध अवस्थेत डोंगराळ परिसरात आढळल्या दोघी
देशातील हाथरस प्रकरणाबद्दल लोकांमध्ये आधीच संताप आहे, परंतु सामूहिक बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकीकडे उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या रातोरात अंत्यसंस्कारामुळे देशाचे लक्ष वेधून घेतले गेले, तर राजस्थानपोलिसांनीही पीडित मुलींना चांगली वागणूक दिलेली नाही.राजस्थान येथे जालोरच्या भीनमाल ठाणे परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी सहा तरूणांनी एका गावातील दोन अल्पवयीन बहिणींना निर्जन असलेल्या डोंगराळ परिसरात नेले आणि तिथे त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. सामूहिक बलात्कारानंतर आरोपींनी दोघींना जसवंतपुरा पोलीस ठाणे हद्दीतील राजपुरा येथील डोंगराळ परिसरात बेशुद्ध अवस्थेत सोडून पळ काढला.
स्थानिकांना याबाबत माहिती मिळाताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांकडूनही या मुलींना योग्य वागणूक मिळाल नसल्याचे सांगितले जात आहे. जखमी झालेल्या आणि वेदनने विव्हळत असलेल्या त्या दोघींसाठी रुग्णवाहिका देखील उपलब्ध झाली नाही. अखेर त्यांना एका रिक्षातून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दोघींपैकी एकीची प्रकृती गंभीर असल्याचे माहिती मिळत आहे. अन्य फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
Rajasthan: Police register a case over alleged rape of 2 minor girls in Jaswantpura, Jalore.
— ANI (@ANI) October 19, 2020
"We have registered a case based on a complaint by victims' family members. 4 teams have been dispatched in search of the accused,' says Dashrath Singh, SP, Sanchor, Jalore
(18.10.2020) pic.twitter.com/gYOHXUP6Mp
भीनमाल भागातील एका गावात तरुणांनी घरात झोपलेल्या दोन अल्पवयीन चुलत बहिणींचे अपहरण केले आणि त्यांच्यावर बलात्कार केला. नंतर मुली राजपुराच्या डोंगरावर फेकून देऊन आरोपी फरार झाले. रात्री थंडीमुळे दोन्ही मुलींची प्रकृती अधिकच खराब झाली, त्यांचे पालक रात्रीभर मुलींचा शोध घेत राहिले. पोलिसांनी सांगितले की, आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी चारही आरोपींना शोधण्यासाठी चार पथके तयार केली आहेत. रविवारी सकाळी दोन्ही मुलींवर बलात्कार झाल्याची माहिती देण्यात आल्याबाबत पोलिसांनी सांगितले.