शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

चलन न करताच पैसे घेणाऱ्या वाहतूक शाखेचे दोन पोलीस हवालदार निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 16:10 IST

तुम्ही स्त्री आहे म्हणून तुम्हाला कमीमध्ये सोडतो़ उरलेले २०० रुपये दुसऱ्याकडून वसूल करतो, असे म्हणून त्यांची गाडी सोडून दिली़.

ठळक मुद्देशंकरशेट रोडवरील सेव्हन लव्हज चौकातील बातमी कोणतीही पावती न दिल्याने तक्रार

पुणे : रस्त्यात वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकाला बाजूला घेऊन त्याच्यावर कारवाई न करता चिरीमिरी घेणारे व गाडी उचलून नेल्यावर दंडाचे पैसे घेऊन चलन न करणाऱ्या दोघा पोलिसांना वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी निलंबित केले आहे़. पोलीस हवालदार एस. बी. घोडके (नेमणूक स्वारगेट वाहतूक विभाग) आणि किसन धोंडिबा गिरमे (नेमणूक शिवाजीनगर वाहतूक विभाग) अशी त्यांची नावे आहेत़ विशेष म्हणजे दंडाची रक्कम कमी का घेतली अशी विचारणा करणाऱ्या महिलेला गिरमे यांनी तुम्ही स्त्री असल्याचे २०० रुपये कमी केले़ ते दुसऱ्यांकडून वसुल करतो, असे धक्कादायक विधान केले होते़. एस. बी. घोडके हे ९ डिसेंबर रोजी शंकरशेट रोडवरील सेव्हन लव्हज चौकात नेमणूकीवर होते़. त्यांनी एका अ‍ॅक्टीव्हा चालकास थांबवून त्याच्यावर चलन कारवाई न करता बाजूला झाडाजवळ नेऊन गैरकृत्य केले़. त्यांच्याकडून चिरीमिरी घेऊन चलन न करता सोडून दिले़ वाहतूक शाखेची प्रतिमा मलिन करणारी हे कृत्य असल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे़. किसन गिरमे हे ६ डिसेंबर रोजी टेम्पो आॅपरेटर म्हणून शिवाजीनगरला नेमणूकीला होते़. त्यांनी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी साखर संकुलजवळून नो पार्किंगमधील एक दुचाकी उचलली़. ही बाब दुचाकीचालक महिलेला समजल्यावर त्या शिवाजीनगर वाहतूक शाखेत गेल्या़. त्यांना गिरमे यांनी त्यांना एक हजार रुपये दंड असल्याचे सांगून एका पुस्तकामध्ये त्यांचे नाव व गाडीचा नंबर यांची नोंद घेऊन त्यांच्याकडून ८०० रुपये स्वीकारले़. त्यांना कोणतेही चलन दिले नाही़. त्यावर या महिलेने एक हजार रुपये दंड आहे तर तुम्ही ८०० रुपये का घेतले असे विचारल्यावर गिरमे यांनी त्यांना तुम्ही स्त्री आहे म्हणून तुम्हाला कमीमध्ये सोडतो़ उरलेले २०० रुपये दुसऱ्याकडून वसूल करतो, असे म्हणून त्यांची गाडी सोडून दिली़. या महिलेला कोणतीही पावती न दिल्याने त्यांनी तक्रार केली़. त्याची दखल घेऊन पोलीस सेवेस अशोभनिय वर्तन केल्याने गिरमे यांना निलंबित करण्यात आले आहे़. 

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीसsuspensionनिलंबनCrime Newsगुन्हेगारीCorruptionभ्रष्टाचार