शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसाला फरफटत नेणाऱ्या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 19:59 IST

सिग्नल तोडून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीचालकाला अडवणाऱ्या वाहतूक पोलिसाला फरफटत नेण्याचा प्रकार घडला़.

पुणे : सिग्नल तोडून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीचालकाला अडवणाऱ्या वाहतूक पोलिसाला फरफटत नेण्याचा प्रकार पुणे-सातारा रोडवरील पुष्पक मंगल कार्यालय चौकात शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडला़.याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे़. फरहान रोशन खान (वय २०), कुरेश रफिक खाटिक (वय १८, दोघे रा़. पृथ्वी पार्क, कोंढवा, मूळ रा़. भुसावळ, जि. जळगाव) अशी त्यांची नावे आहेत़ याप्रकरणी सहकारनगर वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई व्ही़. एम़. येवले यांनी फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले, की येवले शुक्रवारी पुणे-सातारा रोडवरील पुष्पक मंगल कार्यालय चौकात वाहतूक नियमन करीत होते़. त्यावेळी हे दोघे जण चौकातील सिग्नल तोडून कात्रजच्या दिशेने वेगाने जात होते़. तेव्हा येवले  रस्त्याच्या मधोमध आले व त्यांनी दोघांना थांबण्याचा इशारा केला़. तरीही त्यांनी मोपेड न थांबविता रस्त्याच्या विरुद्ध दिशेला स्वारगेटच्या दिशेने यूटर्न घेऊन पळून जाऊ लागले़. त्यावर त्यांनी मोपेडच्या पाठीमागील कॅरिअरला पकडून त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला़. वाहतूक पोलिसांनी आपल्या मोपेडचे कॅरिअर पकडले असल्याचे समजल्यावरही त्यांनी वेगाने गाडी चालविली़. त्यामुळे येवले मोपेडबरोबर भापकर पेट्रोल पंपापर्यंत फरफटत गेले़. पोलिसांनी दोघांना पकडून त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़ .

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीसCrime Newsगुन्हेगारी