उपराजधानीत गृहमंत्र्यांना गुन्हेगारांची सलामी; दहा तासात दोघांची हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 05:50 IST2021-10-22T05:47:32+5:302021-10-22T05:50:27+5:30

सकाळी सात गुन्हेगारांकडून एका गुन्हेगाराची भीषण हत्या; तर रात्री एका तरुणाचा त्याच्या शेजाऱ्यांकडून खून

two murders took place when dilip walse patil is in nagpur | उपराजधानीत गृहमंत्र्यांना गुन्हेगारांची सलामी; दहा तासात दोघांची हत्या 

उपराजधानीत गृहमंत्र्यांना गुन्हेगारांची सलामी; दहा तासात दोघांची हत्या 

नागपूर : राज्याचे गृहमंत्री नागपुरात आले असताना गृहमंत्र्यांनी त्यांना नागपुरातील गुन्हेगारांनी जोरदार सलामी दिली. सकाळी सात गुन्हेगारांनी एका गुन्हेगाराची भीषण हत्या केली. तर रात्री एका तरुणाची त्याच्या शेजाऱ्यांनी भीषण हत्या केली.

मृतक मुरली किशन सोनखसरी (वय २८, रा. दिपटी सिग्नल, बाजार चौक) असून आरोपीचे नाव भारत राजू हिरवानी (वय १८) आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मृतक सोनखसरी आणि आरोपी आजूबाजूला राहतात. हिरवानीच्या घरी नेहमी वादविवाद होतात. नेहमीप्रमाणे आज भांडण सुरू झाल्याचे पाहून ते सोडविण्यासाठी सोनखसरी मध्ये पडले. त्याने आरोपी हिरवाणीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र भारत हिरवानीने बापाला सोडून सोनखसरी सोबत वाद घातला आणि त्याच्या पोटात चाकू मारून त्याची हत्या केली. गृहमंत्री नागपुरात मुक्कामी असताना घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी कळमना पोलिस ठाण्यात धाव घेतली. या घटनेसंबंधाने सविस्तर माहिती वृत्त लिहिस्तोवर उपलब्ध झाली नाही.

Web Title: two murders took place when dilip walse patil is in nagpur