शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दोन अट्टल मोटारसायकल चोरटे ठाण्यात जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 21:41 IST

पाच मोटारसायकली हस्तगत  

ठळक मुद्देदोघांपैकी अजरून हा पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार दोन लाख 40 हजारांच्या पाच मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.

ठाणे - शहापूरातून येऊन ठाण्यात मोटारसायकलींची चोरी करणाऱ्या महेश दशरथ हरणो (19) आणि अर्जुन उर्फ बाळा रघुनाथ दिनकर (22) या दोन सराईत मोटारसायकल चोरटयांना ठाणे नगर पोलिसांनीअटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी गुरुवारी दिली. दोघांपैकी अजरून हा पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार असून त्याचा मित्र अजय शेळके (रा. भिवंडी) याच्या मदतीने ग्रामीण परिसरातही त्याने मोटारसायकली चोरल्याची त्याने कबूली दिली. 

विक्रोळी येथील रहिवाशी किरण गांगुर्डे (25) यांनी त्यांची मोटारसायकल ठाण्याच्या खारटन रोड येथील महात्मा फुले नगर भागात उभी केली होती. तिथून ती चोरीस गेल्याची तक्रार त्यांनी ठाणे नगर पोलीस ठाण्यात 17 सप्टेंबर 2019 रोजी दाखल केली होती. ठाणे शहर परिमंडळाचे पोलीस उपायुक्त बुरसे, नौपाडा विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणोनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक यांच्या पथकाने शिताफीने तपास करुन महेशला 27 सप्टेंबर रोजी तर अजरून याला 29 सप्टेंबर रोजी शहापूर येथून अटक केली. दोघांनाही 2 ऑक्टोबपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. चोरलेल्या मोटारसायकलचे चेसिस क्रमाक आणि वाहनाचा क्रमांक यामध्ये फेरफार केल्याचीही त्यांनी कबूली दिली. त्यांच्याकडून नामांकित कंपन्यांच्या दोन लाख 40 हजारांच्या पाच मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यांनी चोरलेल्या मोटारसायकली कोणाच्या मालकीच्या आहेत. याचा तपास पोलिसांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचीही मदत घेतली. यातील फरार आरोपी अजय शेळके हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचाही शोध घेण्यात येत असल्याचे बुरसे यांनी सांगितले.

टॅग्स :ArrestअटकbikeबाईकRobberyचोरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी