शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सराफाच्या हत्येप्रकरणी आणखी दोघांना अटक, मास्टरमाइंडसह दोघांना सुरत येथे जंगलात पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 12:05 IST

लूट आणि हत्येची ही घटना ३० जून रोजी घडली होती. पाटीदार हा घटनेच्या २५ दिवस आधी मुंबईत आला आणि रेकी करून मारेकऱ्यांना सर्व योजना समजावून तो मुंबईतून परत गेला होता. तर त्याचा साथीदार प्रमोद लखरिया याने या सर्वांना शस्त्र पुरविले.

मुंबई : दहिसरच्या ज्वेलर्समध्ये घुसून शैलेंद्र पांडे (४६) या सराफाची हत्या करण्यात आली होती. दुकानात शिरल्यानंतर थेट गोळी घालून लूट करा असे सांगून शूटर्सना पाठविणाऱ्या बंटी पाटीदार (२३) याच्यासह त्याचा साथीदार प्रमोद लखरिया (२२) याला रविवारी दहिसर पोलिसांनी सुरतच्या पिठमपूर जंगलातून अटक केली आहे.लूट आणि हत्येची ही घटना ३० जून रोजी घडली होती. पाटीदार हा घटनेच्या २५ दिवस आधी मुंबईत आला आणि रेकी करून मारेकऱ्यांना सर्व योजना समजावून तो मुंबईतून परत गेला होता. तर त्याचा साथीदार प्रमोद लखरिया याने या सर्वांना शस्त्र पुरविले. तसेच गोळीबार कसा करायचा, दरोडा कसा घालायचा, ‘टार्गेट’पर्यंत कसे पोहोचायचे याचे प्रशिक्षण दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. हे दोघे सुरतमधील पिठमपूर जंगलात लपल्याची माहिती दहिसर पोलिसांना मिळाली. त्यानुसार परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी आणि दहिसरचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय मराठे, सहायक पोलीस निरीक्षक डॉ. चंद्रकांत घार्गे, ओम तोतावार, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर, अभिनय पवार आणि पथकाने सापळा रचत दोघांना पकडले.

आतापर्यंत एकूण सातजण जेरबंदपाटीदारच्याच इशाऱ्यावरून लूट आणि पांडेंची हत्या करणाऱ्या आयुष पांडे (१९), निखिल चांडाल (२१), उदय बाली (२१) चिराग रावल (२१) आणि अंकित महाडिक (२१) या पाच जणांना यापूर्वीच सुरत जवळून अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणातील अटक आरोपींची एकूण संख्या ७ झाली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसjewelleryदागिने