ऊसतोड मजुराच्या दोन अल्पवयीन मुलींचे झोपडीतून अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 23:33 IST2018-12-24T23:31:36+5:302018-12-24T23:33:02+5:30
ऊसतोड महिला मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींचे त्यांच्या राहत्या कोपीतून अपहरण करण्यात आले. ही घटना रविवारी मध्यरात्री साडेतीनच्या दरम्यान माढा तालुक्यातील मुंगशी येथे घडली.

ऊसतोड मजुराच्या दोन अल्पवयीन मुलींचे झोपडीतून अपहरण
सोलापूर : ऊसतोड महिला मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींचे त्यांच्या राहत्या कोपीतून अपहरण करण्यात आले. ही घटना रविवारी मध्यरात्री साडेतीनच्या दरम्यान माढा तालुक्यातील मुंगशी येथे घडली.
सुवर्णा सचिन काळे (रा. डोंजा, ता. परंडा) या ऊस तोडण्यासाठी मुंगशी येथे त्यांच्या टोळीसोबत असताना त्यांच्या दोन मुली अश्विनी (वय १३) व सानिका (वय ७) या झोपडीत झोपल्या होत्या. दरम्यान, बबुशा बाशा पवार, लखन बाशा पवार (दोघे रा. बार्शी रोड, परंडा, जि. उस्मानाबाद) व दत्ता बलाशा काळे (रा. मुंगशी रोड, परंडा, जि. उस्मानाबाद) या तिघांनी रात्री तीन वाजताच्या सुमारास पळवून नेले. या घटनेमुळे ऊ सतोड मजुरांमध्ये खळबळ उडाली आहे.