लोणी काळभोर परिसरात दोन लाखांचा अवैैध गुटखा जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 18:00 IST2018-10-13T18:00:13+5:302018-10-13T18:00:44+5:30

गुटख्याची अवैध वाहतूक करणारी एक चारचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यात १ लाख ८० हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

Two lakhs of unauthorized gutkha seized in Loni Kalbhor area | लोणी काळभोर परिसरात दोन लाखांचा अवैैध गुटखा जप्त 

लोणी काळभोर परिसरात दोन लाखांचा अवैैध गुटखा जप्त 

ठळक मुद्देविमल पानमसाला या अवैध गुटख्याने भरलेले १२ पोते ताब्यात

लोणी काळभोर : गुटख्याची अवैध वाहतूक करणारी एक चारचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यात १ लाख ८० हजार रुपये किमतीचा गुटखा व इरटिगा या चारचाकीसह एकूण ७ लाख ८० हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. लोणी काळभोरपोलिसांनी ही कारवाई केली आहे. याप्रकरणी सुमित दुर्गाप्रसाद गुप्ता ( वय २०, रा. पाटीलवस्ती,लोणीकाळभोर ता.हवेली ) याला अटक करण्यात आली आहे. 
 पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना बातमीदारामार्फत एका काळ्या रंगाच्या चारचाकीमध्ये अवैधरित्या गुटखा होत असून, आणि ती काही वेळातच सोलापुर - पुणे महामार्गाने येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे ढवाण, पोलीस उपनिरीक्षक चेतन थोरबोले आणि पोलीस हवालदार सतीश रजपुत यांनी थेऊर फाटा चौक परिसरात सापळा लावला. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास महामार्गावरून सोलापुरच्या दिशेने पुण्याकडे (एमएच.१२ पी.एन. ५१८५ )जात असताना पोलिसांनी ती गाडी ताब्यात घेतली. यावेळी  पोलिसांनी या चारचाकीत तपासणी केली असता एकुण अवैध गुटख्याने भरलेले १२ पोते दिसले. त्यात विमल पानमसाला गुटखा आढळून आला. त्यानुसार अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा मुद्देमाल ताब्यात घेतला.

Web Title: Two lakhs of unauthorized gutkha seized in Loni Kalbhor area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.