पिंपरी-चिंचवड (वाकड) : चोरट्यांनी कुटुंबीय देव दर्शनाला गेल्याचा फायदा घेत घराचा दरवाजा उचकटून घरातील सव्वा लाखांची रोकड लाख व सोन्या चांदीचे दागिने असा २ लाख ९ हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. हा प्रकार गुरुवारी (दि १५) रात्री बाराच्या सुमारास शिवतीर्थ नगर थेरगाव येथे घडला. याप्रकरणी दत्तात्रय कृष्णदेव शेरखाने (वय ३४,रा.सुंदर कॉलनी, शिवतीर्थ नगर थेरगाव) यांनी वाकड पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वाकड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हरिष माने यांनी दिलेली माहिती, शेरखाने कुटुंबीय दिवाळीची सुट्टी असल्याने शिर्डी, शनि शिंगणापूर व वणी दर्शनाला गेले होते. दरम्यान, दिनांक १२ ते १३ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन ते चारच्या सुमारास घराचे कुलूप उचकटुन घरातील १ लाख २२ हजार रुपये रोख रक्कमेसह सोन्याचे कानातील झुमके,कर्णफुले, बदाम, अंगठी व १२ तोळे वजनाच्या चांदीच्या पट्ट्या असा २ लाख ९ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. वाकड पोलीस तपास करत आहेत.
थेरगावमध्ये दोन लाखांची घरफोडी, रोख रक्कम व दागिने लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 14:33 IST
देव दर्शनाला गेल्याचा फायदा घेत घराचा दरवाजा उचकटून घरातील सव्वा लाखांची रोकड लाख व सोन्या चांदीचे दागिने असा २ लाख ९ हजार रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला.
थेरगावमध्ये दोन लाखांची घरफोडी, रोख रक्कम व दागिने लंपास
ठळक मुद्देवाकड पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल