शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-नाशिक महामार्गावर टेम्पो अपघातात दोघांचा मृत्यू, वाहतुकीचा झाला खोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 17:57 IST

Accident Case : या अपघातामध्ये टेम्पोचालक सलमान खान (३४) याच्यासह क्लिनर फिरोज खान (३२) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

ठाणे: कोंबडयांची वाहतूक करणा:या टेम्पोचा मुंबई नाशिक महामार्गावर ठाणे,खारेगावजवळ रविवारी सकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघातामध्ये टेम्पोचालक सलमान खान (३४) याच्यासह क्लिनर फिरोज खान (३२) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे या महामार्गावरील ठाण्याकडे येणारी वाहतूक सुमारे तासभर खोळंबली होती. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या एका बाजूला केल्यानंतर जवळपास एक तासांनी वाहतुक सुरळीत होण्यास सुरु वात झाली.

सलमान हा फिरोज याच्यासह कोंबड्यांनी भरलेला टेम्पो घेऊन नाशिक हुन ठाण्यात येत होता. याचदरम्यान ठाण्यातील खारेगाव जवळ तो टेम्पो पुढे असणार्या कंटेनरला जाऊन जोरात धडकला. ही धडक इतकी जोरदार होती की, टेम्पो चालकासह क्लिनर या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच, ठाणो महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग, कळवा वाहतूक पोलीस आणि अगिशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. चालक आणि क्लिनरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. अपघातामुळे वाहनांमधील तेल रस्त्यावर सांडले होते. या अपघातामुळे ठाण्याच्या दिशेने येणारी वाहतूक काही काळ खोळंबली होती. सुमारे एक तासाने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. त्यानंतर ठाण्याकडे येणारी वाहतुक सुरळीत झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी संतोष कदम यांनी दिली.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूMumbaiमुंबईNashikनाशिक