नालासोपार्‍यात पुर्ववैमन्यासातून मुख्य रस्त्यावर गोळीबार, दोन जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2021 23:25 IST2021-02-14T23:23:40+5:302021-02-14T23:25:06+5:30

Nalasoparta : आरोपींनी गावठी कट्यातून चार गोळीच्या फैरी झाडल्या.

Two injured in road mishap in Nalasoparta | नालासोपार्‍यात पुर्ववैमन्यासातून मुख्य रस्त्यावर गोळीबार, दोन जखमी

नालासोपार्‍यात पुर्ववैमन्यासातून मुख्य रस्त्यावर गोळीबार, दोन जखमी

नालासोपारा : पूर्वेकडील मोरेगाव येथे रविवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास एका पुर्ववैमन्यासातून दोन गटात वाद झाला. यावेळी आरोपींनी गावठी कट्यातून गोळीबार केला. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. आरोपींनी गावठी कट्यातून चार गोळीच्या फैरी झाडल्या. त्यात बळीराम गुप्ता याला दोन गोळ्या लागल्या तर राजकुमार गुप्ता याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. 

गुप्ता याला प्राथमिक उपचारासाठी पालिकेच्या तुळींज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमी गुप्ता याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Two injured in road mishap in Nalasoparta