नाशिकच्या सिडको भागात दोन गटात हाणामारी, धारदार शस्त्राने वार केल्याने युवक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 05:32 IST2021-07-27T05:31:51+5:302021-07-27T05:32:09+5:30
रात्री उशिरा अंबड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बेडवाल व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते

नाशिकच्या सिडको भागात दोन गटात हाणामारी, धारदार शस्त्राने वार केल्याने युवक गंभीर जखमी
नाशिक- शहरातील सिडको येथील बडदे नगर ते पाटील नगर या रस्त्या दरम्यान सोमवारी रात्री एका गटाच्या टोळक्याने दुसऱ्या गटाच्या तरुणास धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले आहे. जखमी तरुण हा मनसेचा शस्त्राने असल्याचे समजते .
याबाबत पोलिसांनी माहिती दिली की सोमवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास बडदे नगर ते पाटीलनगर या रस्त्याचा दरम्यान एका तरुणास समोरून आलेल्या टोळक्याने धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. मागील भांडणाची कुरापत काढून या तरुणास मारहाण केली असल्याचे समजते. रात्री उशिरा अंबड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बेडवाल व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रात्री खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.