मारहाण केल्याच्या कारणावरुन थेरगावमध्ये दोन कुटुंबात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 17:32 IST2019-04-11T17:28:00+5:302019-04-11T17:32:09+5:30
याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मारहाण केल्याच्या कारणावरुन थेरगावमध्ये दोन कुटुंबात हाणामारी
पिंपरी : मारहाण केल्याच्या कारणावरुन थेरगाव येथील दगडूपाटील नगर येथे दोन कुटुंबात हाणामारी झाली. ही घटना मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
इजहार जुमनअली मोहंमद (वय ४५, रा. वहिनीसाहेब कॉलनी, दगडूपाटील नगर, थेरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शौकत हमीद शेख (वय ४५,रा. वहिनीसाहेब कॉलनी, थेरगाव) याच्यासह त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शौकत शेख याच्या मुलाने फिर्यादी मोहंमद यांच्या भावास मारहाण केली होती. म्हणून मोहंमद यांनी शेखला विचारणा केली असता त्याच्या पत्नीने मोहंमद यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. यासह शेखने देखील मोहंमद यांना बांबुने डोक्यात मारहाण केली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत.तर शौकत हमीद शेख (वय ४५, रा. वहिनीसाहेब कॉलनी, थेरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मोहम्मद इजहार (रा. वहिनीसाहेब कॉलनी, थेरगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास इजहार याने शौकत शेख यांच्या मुलाला मारहाण केली. याबाबत शेख यांनी त्याला विचारणा केली असता इजहारने त्यांना शिवीगाळ करीत दगड मारल्याने त्यांच्या डोळ्याखाली इजा झाली. तसेच शेख यांच्या पत्नीलाही शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत.