कामोठे अपघात प्रकरण : आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 20:32 IST2019-07-24T20:29:45+5:302019-07-24T20:32:35+5:30
26 जुलै रोजी आरोपीला न्यायालायसमोर पुन्हा हजर केले जाईल.

कामोठे अपघात प्रकरण : आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी
ठळक मुद्देतपास अधिकारी मधुकर भटे यांनी हि माहिती दिली.आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपी हरविंदरसिंग हरभजन मटारु (75) या आरोपीला कामोठे पोलिसांनी बुधवारी पनवेल येथील न्यायालयासमोर हजर केले
पनवेल - कामोठे अपघातातील आरोपी हरविंदरसिंग हरभजन मटारु (75) या आरोपीला कामोठे पोलिसांनी बुधवारी पनवेल येथील न्यायालयासमोर हजर केले असता आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास अधिकारी मधुकर भटे यांनी हि माहिती दिली. 26 जुलै रोजी आरोपीला न्यायालायसमोर पुन्हा हजर केले जाईल. दरम्यान तपासात कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नसल्याचे सांगत राष्ट्रवादी, कॉंग्रेस ,शेकापच्या कार्यकर्त्यांनी कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास सोनावणे यांची भेट घेतली.