शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी परिसरात घरफोडीच्या दोन घटनांमध्ये सव्वा नऊ लाखांचा ऐवज लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 17:16 IST

भोसरी व बावधन येथे घडलेल्या घरफोडीच्या दोन घटनांमध्ये चोरट्यांनी सव्वा नऊ लाखांचा ऐवज लंपास केला....

पिंपरी : भोसरी व बावधन येथे घडलेल्या घरफोडीच्या दोन घटनांमध्ये चोरट्यांनी सव्वा नऊ लाखांचा ऐवज लंपास केला. भोसरीतील इंद्रायणीनगर येथे घडलेल्या घटनेत चोरट्याने ४ लाख ६४ हजार ४०० रुपये किंमतीचा ऐवज लपास केला. याप्रकरणी शांताराम धोंडिबा चोरघे (वय ६५, रा. सेक्टर क्रमांक, १, प्लॉट नं. ३६७, लक्ष्मीकुबेर बंगला, महाराष्ट्र कॉलनी, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १४ ते १६ मे या कालावधीत घडली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चोरघे यांच्या राहत्या बंगला बंद होता. दरम्यान, बंगल्याच्या पहिल्या मजल्यावरील बाल्कनीच्या दरवाजाची काच तसेच कुलूप, कडी-कोयंडा तोडून चोरटा आत शिरला. त्यानंतर बेडरुमच्या दरवाजाचे कुलूप तोडून लाकडी कपाट उचकटून त्यामध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ४ लाख ६४ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.     तर दुसरी घटना बावधन येथे घडली. याप्रकरणी श्रीकांत मुकुंदराव भट (वय ३६,रा. बंगला क्रमांक ३६, रॉयल हिल्स  सोसायटी, रिगालिया बिल्डिंग कंपाउंड, अरिहंत कॉलेजच्यामागे, उत्तमनगर, बावधन बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना ११ ते १५ मे या कालावधीत घडली.             पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीकांत भट यांचा राहता बंगला बंद असताना बेडरुममधील खिडकीचे गज कापून चोरटा आत शिरला. त्यानंतर कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले दागिने व रोकड असा ४ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.परी परिसरात घरफोडीच्या दोन घटनांमध्ये सव्वा नऊ लाखांचा ऐवज लंपास

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरी