उल्हासनगरात दोघा भावांचे अपहरण करून एकाची केली हत्या, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 20:40 IST2020-09-29T20:34:48+5:302020-09-29T20:40:03+5:30
याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

उल्हासनगरात दोघा भावांचे अपहरण करून एकाची केली हत्या, गुन्हा दाखल
उल्हासनगर : चिंचपाडा येथील चायनीज हॉटेलमध्ये काम करणाऱ्या दोघा भावांचे मोटारसायकल चोरीच्या संशयावरून रविवारी रात्री १ वाजता मारहाण करून कारमध्ये अपहरण केले. एका भावाला नांदिवली गावा जवळ उतरून दिले असून दुसऱ्या भावाचा मृत्युदर दुसऱ्या दिवशी हातपाय बांधलेल्या अवस्थेत मिळाला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा येथील चायनीज हॉटेलमध्ये भरत व राजू थापा असे दोन भाऊ काम करीत होते. २७ सप्टेंबरच्या रात्री १ वाजता १० ते १२ जणाच्या टोळक्याने मोटारसायकल चोरल्याचा संशयावरून दोघे भावना जबरी मारहाण केली. तसेच कारमध्ये जबरदस्तीने टाकून घेवून गेले. नांदिवली गावाजवळ रस्त्याच्या बाजूला राजू थापा याला कार मधून उतरून दिले. तर भरत याला कार मध्ये घेवून गेले. दुसऱ्या दिवसी भरत याचा मृतदेह नेवाळी - मंगरूळ रस्त्यावर मिळून आला. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली असून राजू थापा यांच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलिसांनी १० ते १२ जनाच्या टोळक्यावर अपहरण, खुनाचा गुन्हा दाखल केला.
शहारा शेजारील हाजी मलंग परिसरात चोरी, हाणामारी, खून आदी घटनेत वाढ झाली असून पोलिस गस्त वाढविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली. विठ्ठलवाडी पोलिसांनी खून, अपहरण आदी गुन्ह्याची नोंद करून गुन्हेगारी टोळक्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांच्या डोळ्यात तरळले अश्रू, जिभेचा तुकडा पडूनही पीडितेने नराधमांविरोधात जबाब देण्याचा केला प्रयत्न https://t.co/OEUq0mVOdf
— Lokmat (@MiLOKMAT) September 29, 2020