शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

चिंचवड येथे घरफोडीप्रकरणी मित्रासह दोन भावांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 18:52 IST

चोरीला गेलेल्या ४७ तोळे सोन्याचे दागिने व ४६० रुपयांची नाणी असा १३ लाख ८२ हजार ३७३ रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.

ठळक मुद्देगुन्हेगारांना १२ तासांत केले जेरबंद; ४७ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत

पिंपरी : घरफोडी करून दागिन्यांसह रोकड लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना १२ तासांत जेरबंद करण्यात आले. चोरीला गेलेल्या ४७ तोळे सोन्याचे दागिने व ४६० रुपयांची नाणी असा १३ लाख ८२ हजार ३७३ रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. एका मित्रासह दोन भावांना अटक केली आहे. चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्या उर्फ चंद्रकांत अनंत माने (वय २६, रा. चिंचवड), बिल्डर उर्फ शशिकांत अनंत माने (वय २२, रा. हडपसर, पुणे) व कम्या उर्फ कमलेश दिलीप कसबे (वय २२, रा. पत्राशेड,लिंकरोड,चिंचवड) अशी आरोपींची नावे आहेत. चंद्या माने हा चिंचवड पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील गुन्हेगार व तडीपार आहे. चंद्या व बिल्डर उर्फ शशिकांत दोन्ही भाऊ आहेत. कम्या त्यांचा मित्र आहे. चंद्या माने वाल्हेकरवाडीतील पेट्रोल पंपाजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता, बिल्डर व कम्या यांच्यासोबत चिंचवड येथे घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरी केल्याचे त्याने सांगितले. तसेच चिंचवड लिंकरोड येथील पत्राशेडमधील दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातील रोकड लंपास केल्याचेही त्याने कबूल केले. त्यानंतर पोलिसानी बिल्डर व कम्या या दोघांना लिंकरोडवरील पत्राशेड समोरील मोकळ्या इमारतीतून ताब्यात घेतले. चौकशी करून त्यांच्याकडून ४७ तोळे सोन्याचे दागिने व ४६० रुपयांची नाणी असा १३ लाख ८२ हजार ३७३ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्यामुळे चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल केलेले घरफोडीचे दोन गुन्हे १२ तासांत उघड करून चोरी गेलेला मुद्देमाल १०० टक्के हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. चंद्या, बिल्डर व कम्या या तिघांना पोलिसांनी अटक केले. त्यांच्यावर पिंपरी-चिंचवड व पुणे शहर पोलीस आयुक्तालय तसेच पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतही चोरी, घरफोडी केल्याचे गुन्हे दाखल आहेत.  वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव, पोलीस उप निरीक्षक सोमनाथ झेंडे, दत्तात्रय गायकवाड, पांडुरंग जगताप, सुधाकर अवताडे, स्वप्नील शेलार, ऋषिकेश पाटील, नितीन राठोड, गोविंद डोके, अमोल माने, सचिन वर्णेकर, पंकज भदाणे यांच्या पथकाने कारवाई केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीArrestअटकtheftचोरीPoliceपोलिस