नांदेडात वेगवेगळ्या ठिकाणी दोन मृतदेह आढळून आल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 11:20 IST2018-08-03T11:19:59+5:302018-08-03T11:20:57+5:30

नांदेड तालुक्यात शुक्रवारी पहाटे वेगवेगळ्या ठिकाणी दोन मृतदेह आढळून आले. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे.

Two bodies were found in different places in Nanded | नांदेडात वेगवेगळ्या ठिकाणी दोन मृतदेह आढळून आल्याने खळबळ

नांदेडात वेगवेगळ्या ठिकाणी दोन मृतदेह आढळून आल्याने खळबळ

नांदेड : नांदेड तालुक्यात शुक्रवारी पहाटे वेगवेगळ्या ठिकाणी दोन मृतदेह आढळून आले. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे.

नांदेड तालुक्यातील तळणी शिवारात उद्धव सुर्यवंशी (वय ३५) या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. सदर रस्त्यावर पहाटे रनिंग करणाऱ्या मुलांना मृतदेह दिसल्याने त्यांनी गावकरी आणि पोलिसांना कळविले. यानंतर लिंबगाव ठाण्याच्या पोलीस निरीक्षक बोरगावकर यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे. उद्धव सूर्यवंशी हे तळणी येथील रहिवासी आहेत. सदर व्यक्तीचा खून करून मृतदेह रस्त्यावर आणून टाकला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. 

दरम्यान, नांदेड शहरानजिक बोढार शिवारात एका मुलीचा मृतदेह आढळून आला आहे. सदर मुलीला जाळून मारल्याची माहिती आहे. घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली आहे.

Web Title: Two bodies were found in different places in Nanded