उल्हासनगरात दोन पिस्तूलासह दोघांना अटक; गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Updated: May 25, 2023 15:18 IST2023-05-25T15:17:50+5:302023-05-25T15:18:29+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-५ दुधनाका परिसरात दोघे जण पिस्तुल विकण्यासाठी येत असल्याची गुप्त माहिती शहर गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती

उल्हासनगरात दोन पिस्तूलासह दोघांना अटक; गुन्हा दाखल
उल्हासनगर : कॅम्प नं-५ येथील दूधनाका जवळ मंगळवारी दुपारी दोघांना दोन पिस्तूलासह शहर गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-५ दुधनाका परिसरात दोघे जण पिस्तुल विकण्यासाठी येत असल्याची गुप्त माहिती शहर गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार विभागाने सापळा रचून मंगळवारी दुपारी साडे तीन वाजता संशयीरीत्या फिरत असलेल्या आसिफ नसीर शेख व तौकिफ हसन शेख यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे दोन पिस्तुले, १० राऊंड जिवंत काडतुसे मिळून आली. त्यांनी पिस्तुले कुठून आणले. याबाबत गुन्हे अन्वेषण विभाग तपास करीत असून याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.