शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

अडीच लाखांचे २४ मोबाईल चोरणार्‍या दोघा सराईताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 8:28 PM

पाटे संस्कृती मैदानाजवळ एका दुचाकीवर बसलेल्या दोघांना ताब्यात घेतले.

 

पुणे : पाटे संस्कृती मैदानात संशयास्पदरित्या थांबलेल्या दोघा तरुणाकडे केलेल्या चौकशीत त्यांनी लॉकडाऊनच्या काळात तब्बल  अडीच लाख रुपयांचे २४ मोबाईल चोरल्याचे उघडकीस आले आहे.अमर वैजनाथ समुखराव (वय२०, रा़ आंबेगाव पठार, मुळ पांढरगाव, ता़ गंगाखेड, जि. परभणी) आणि प्रविण ऊर्फ अनिल नामदेव विटकर (वय २३, रा़ जांभुळवाडी रोड, कात्रज) अशी त्यांची नावे आहेत. दत्तवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस शिपाई सागर सुतकर यांना माहिती मिळाली होती़ त्यानुसार पाटे संस्कृती मैदानाजवळ एका दुचाकीवर बसलेल्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील दुचाकीची कागदपत्रे नव्हती. त्यांच्याकडील मोबाईल कोठून आणला याची चौकशी केल्यावर तो पर्वतीयेथील तावरे कॉलनी येथून चोरला असल्याचे त्यांनी सांगितले. दोघांना ताब्यात घेऊन केलेल्या अधिक तपासात त्यांनी गेल्या ३ महिन्यात तब्बल २४ मोबाईल चोरल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी ते जप्त केले आहेत. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :PuneपुणेMobileमोबाइलtheftचोरी