सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दोघांना अटक; भोजपुरी चित्रपट, वेबसिरीजमधील ५ तरुणींची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 20:29 IST2021-05-02T20:28:16+5:302021-05-02T20:29:14+5:30
Sex Racket : मॉडेलिंग व चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणींना वेश्या व्यवसायसाठी पुरवले जात असल्याची माहिती मीरा भाईंदर - वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या शाखा १ ला मिळाली.

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दोघांना अटक; भोजपुरी चित्रपट, वेबसिरीजमधील ५ तरुणींची सुटका
मीरारोड - मीरारोड भागातील एका लॉजजवळून वेश्या व्यवसायसाठी आणलेल्या ५ तरुणींची सुटका करून फोटोग्राफी व कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या दोन दलालांना पोलिसांनीअटक केली आहे.
मॉडेलिंग व चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणींना वेश्या व्यवसायसाठी पुरवले जात असल्याची माहिती मीरा भाईंदर - वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या शाखा १ ला मिळाली. त्यासाठी एक बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी खात्री केल्यावर शुक्रवारी रात्री सापळा रचून हे सेक्स रॅकेट उघडकीस आणले.
गेल्या वर्षीपासून कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन असल्याने आर्थिक स्थिती बिकट असल्याचा गैरफायदा घेऊन ह्या तरुणींना वेश्या व्यवसायात ढकलण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी सुटका केलेल्या ह्या तरुणी भोजपुरी चित्रपट, वेब सिरीज व मॉडेलिंग क्षेत्रातील आहेत. तर दलाली करणारे दोन आरोपी हे फोटोग्राफी व कपड्याच्या व्यवसायात आहेत. फोटोग्राफीच्या अनुषंगाने ह्या तरुणी आरोपींच्या संपर्कात आल्या होत्या. मीरारोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.