इन्स्टाग्रामवर मैत्री करून विवस्त्र व्हिडिओ व्हायरल केला, सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत धमकी, खंडणी घेणाऱ्या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 09:55 IST2025-10-19T09:55:12+5:302025-10-19T09:55:26+5:30
नयानगर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या १८ वर्षाच्या तरुणीस ऑगस्ट मध्ये एका इंस्टाग्राम आयडीवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली.

इन्स्टाग्रामवर मैत्री करून विवस्त्र व्हिडिओ व्हायरल केला, सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत धमकी, खंडणी घेणाऱ्या दोघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मिरारोड येथे राहणाऱ्या एका तरूणी सोबत इंस्टाग्रामवर ओळख करून विवस्त्र व्हिडिओ व्हायरल केला. तसेच सीबीआय अधिकारी असल्याची धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या दोघांना भिवंडी मधून मीरा भाईंदर गुन्हे शाखेने अटक केली आहे.
नयानगर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या १८ वर्षाच्या तरुणीस ऑगस्ट मध्ये एका इंस्टाग्राम आयडीवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली. रिक्वेस्ट पाठविणाऱ्याने तो दिल्लीचा असून लंडनमध्ये व्यवसाय करतो सांगितले. मैत्री व त्यांच्यामध्ये व्हाटस्अपद्वारे चॅटींग सुरु झाले. ६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री अनोळखी इसमाने व्हिडीओ कॉल करून धमकावून विवस्त्र होण्यास भाग पाडले. दुसऱ्या दिवशी सीबीआय मधून बोलतोय सांगून विवस्त्र व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत १८ हजार रुपयांची मागणी केली. काही रक्कम देऊन सुद्धा फोन करून पैशांची मागणी होत होती. तिचा व्हिडीओ तुच्या वडिल व भाऊ यांना पाठवत आणखी व्हायरल न करण्यासाठी पैसे मागितले जात होते.
नयानगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीं विरुद्ध गुन्हा दाखल झाला मात्र त्याचा समांतर तपास मीरा भाईंदर गुन्हे शाखा १ चे निरीक्षक सुशीलकुमार शिंदे आणि पथकाने सुरु केला. तरुणीने ट्रान्सफर केलेली रक्कम भिवंडी येथील मोहम्मद शादाब मो. मुश्ताक अन्सारी याच्या खात्यात जमा झाली होती. त्याला पकडल्या नंतर त्याने ती रक्कम भिवंडीच्याच मोहम्मद ताहा मो. मुजाहिद अन्सारी याच्या खात्यात पाठवली होती. पोलिसांनी त्याला देखील पकडले. मोहम्मद ताहा अन्सारी याने खंडणीच्या रकमेतून क्रिप्टोकरन्सी खरेदी परत परदेशात असलेल्या वकास खान याला पाठवल्याचे आढळून आले आहे.