शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

फायनान्स कंपनीची फसवणूक करणाऱ्या दोघांना कर्नाटकामधून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 20:35 IST

३ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांना सायबर क्राईम सेलने कर्नाटकामधून अटक केली.

पुणे : फायनान्स कंपनीच्या कस्टमर केअरला फोन करुन ई एमआय कार्डधारका मोबाईल क्रमांक बदलून त्या कार्डाद्वारे अ‍ॅमेझॉन व फ्लिपकार्ट वर आॅनलाईन शॉपिग करुन ३ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांना सायबर क्राईम सेलने कर्नाटकामधून अटक केली. विकास सोमशेखर (वय २६, रा़ टुमकूर, कर्नाटक) आणि संजू शशीकुमार (वय २५, रा़ टुमकूर, कर्नाटक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत,हा प्रकार २२ मे ते २६ आॅक्टोंबर २०१८ दरम्यान झाला होता.

    याप्रकरणी हेमंत अहिरराव (रा़ कात्रज) यांनी फिर्याद दिली होती़ अहिरराव हे बजाज फिनसर्व कंपनीमध्ये नोकरीला आहेत़ कंपनीच्या ग्राहकांच्या संदर्भाने झालेल्या अपहाराची चौकशी करण्याचे काम करतात. २२ मे ते २६ आॅक्टोंबर दरम्यान एकाने बजाज फिनासर्व फायनान्स कंपनीचे कस्टमर केअरला फोन करुन त्यांच्याकडे असलेल्या ईएमआय कार्डधारकाचे माहितीवरुन ग्राहक बोलत असल्याचे भासविले. कंपनीकडे रजिस्टर असलेला मोबाईल क्रमांक बदलून घेतला. त्या ग्राहकाच्य ईएमआय कार्डवरुन त्याने अ‍ॅमेझॉन व फ्लिपकार्ट या आॅनलाईन शॉपिंग साईटवर एकूण ३ लाख ६५ हजार रुपयांची खरेदी केली. त्याचे बिल मुळ ग्राहकाला गेल्यावर ही फसवणूक उघड झाली होती. या गुन्ह्याचा सायबर क्राईम सेल समांतर तपास करीत होते. सायबर सेलद्वारे तांत्रिक तपासात दोघे आरोपी बंगलुरु व टुमकुर या ठिकाणी हे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले. सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक किरण औटे, पोलीस शिपाई शिरीष गावडे, नितेश शेलार, भुषण शेलार या पथकाने जाऊन बंगलुरु व टुमकुर येथे तपास केला. त्यात दोघे जण भाड्याने घर घेऊन रहात असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या घरावर ३ नोव्हेंबरला छापा घालून दोघांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ५ मोबाईल, १४ सिमकार्ड, ७ एटीएम कार्ड, १ लॅपटॉप असा ८७ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या दोघांना अटक करुन अधिक तपासासाठी विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

   पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliceपोलिसArrestअटक