अफगाणिस्तान - नांगरहार जिल्ह्यातील हस्का मेना परिसरातील जाव्ह दारा मशिदीत नमाजाच्यावेळी दोन बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकाच खळबळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बॉम्बस्फोटात जवळपास १०० हून अधिक नागरिक जखमी आहेत. ६२ जणांचा मृत्यू झाला आहे. या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
शुक्रवार असल्याने मशिदीत नमाजासाठी गर्दी होती. वर्दळीच्या वेळी बॉम्बस्फोट झाल्याने ६२ जणांचा मृत्यू झाला असून हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अद्याप हे स्फोट कोणत्या दहशतवादी संघटनने घडवून आणले याबाबत तपास यंत्रणांनी खुलासा केलेला नाही. तपास यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून चौकशी सुरु आहे. मात्र, प्रत्यक्षदर्शींनी इमारतीचे छत पूर्णतः स्फोटात कोसळले असल्याची माहिती दिली.