शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
8
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
9
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
10
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
11
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
14
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
15
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
16
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
17
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
18
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
19
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
20
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   

फ्लश केली गेली होती वैशालीची सुसाईड नोट, पोलिसांनी चिठ्ठीचा एक-एक तुकडा जोडला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 19:52 IST

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये टेलिव्हिजन अभिनेत्री वैशाली ठक्कर आत्महत्या प्रकरणाचा पोलीस वेगानं तपास करत आहेत.

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये टेलिव्हिजन अभिनेत्री वैशाली ठक्कर आत्महत्या प्रकरणाचा पोलीस वेगानं तपास करत आहेत. पोलिसांनी अभिनेत्रीच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या राहुल आणि त्याची पत्नी दिशा यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी अभिनेत्रीची एक डायरी जप्त केली. त्यात अभिनेत्रीने तिच्या अनेक वैयक्तिक गोष्टींचा उल्लेख केला होता. टॉयलेटमध्ये फेकलेल्या सुसाईड नोटची फाडण्यात आलेली पानेही पोलिसांनी जप्त केली आहेत. पोलीस ठाण्याचे प्रभारी आर.डी.कनवा यांनी सुसाईड नोटची फाडलेली पानं जोडून महत्वाची माहिती गोळा केली आहे. 

तेजाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईबाग कॉलनीतील हे प्रकरण आहे. येथे राहणारी टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की शेजारी राहणारा राहुल इंटरनेट कॉलिंगद्वारे अभिनेत्री वैशालीचा छळ करत असे. निराश होऊन अभिनेत्रीने राहुलचे अनेक नंबर ब्लॉक केले. अभिनेत्री आणि राहुल यांच्यात काहीतरी भांडण असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे, मात्र काही कारणांमुळे दोघेही नंतर वेगळे झाले. त्यानंतर राहुल वैशालीला सतत त्रास देऊ लागला. वैशालीने तिच्या कुटुंबीयांना राहुलकडून त्रास होत असल्याचे सांगितले होते. कुटुंबीयांनी राहुलच्या कुटुंबीयांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आणि त्यांना समजावून सांगण्यात आले. त्यानंतरही राहुल वैशालीला त्रास देत होता, अशी माहिती समोर आली आहे. 

आरोपी अभिनेत्रीच्या घरी वारंवार यायचा आणि अत्याचार करायचापोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल आणि वैशालीच्या कुटुंबात खूप जवळीक होती, त्यामुळे राहुल हा अनेकदा वैशालीच्या भावाकडे येत असे. तासनतास व्हिडीओ गेम खेळायचा आणि यादरम्यान तो वैशालीला त्रास द्यायचा. त्याचबरोबर कुटुंबीयांनीही पोलिसांना सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून राहुल वैशालीला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देत होता. राहुलमुळेच अभिनेत्री डिप्रेशनमध्ये गेली आणि तिने असे पाऊल उचलले.

राहुलनेच अभिनेत्री वैशालीचे लग्नही मोडल्याचे तपासात समोर आले आहे. जिथे जिथे अभिनेत्री वैशालीच्या लग्नाची चर्चा होती तिथे राहुल चुकीची माहिती देऊन लग्न मोडायचा. त्याचबरोबर केनियाच्या अभिनंदन नावाच्या तरुणाशी अभिनेत्रीचे लग्न ठरले होते, तिथेही राहुलने चुकीची माहिती देऊन लग्न मोडले, अशी माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद केली आहे. या गोष्टींमुळे अभिनेत्री वैशाली खूप अस्वस्थ झाली आणि डिप्रेशनमध्ये गेली.

टॅग्स :Televisionटेलिव्हिजन