शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कामावरून कमी केल्याने कंपनीचे फेसबुक बंद करण्याचा प्रयत्न; मुंबईतील महिलेवर गुन्हा नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 21:48 IST

कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फिलोमिना कॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत.

ठळक मुद्देअमरिता गुजराल सचदेव असे संशयिताचे नाव असून, ती मुंबईतील गोरेगाव येथील रहिवाशी आहे. कोलवा येथील कारावेला बीच रिर्सोट अदवानी हॉटेल्स अ‍ॅण्ड रिर्सोटस ( इंडिया लिमिटेड) चे सुरक्षा व्यवस्थापक लुईस डिकॉस्ता हे तक्रारदार आहेत. माहिती तंत्रज्ञान कायदा २000 कलम ७२ अंतर्गंत कोलवा पोलिांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे.

मडगाव - कामावरुन कमी केल्यानंतर त्याचा वचपा म्हणून कंपनीच्या फेसबुक पेजवर छेडछाड करुन पेज बंद करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली मूळ मुंबईतल्या एका महिलेवर गोव्यातील कोलवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अमरिता गुजराल सचदेव असे संशयिताचे नाव असून, ती मुंबईतील गोरेगाव येथील रहिवाशी आहे.

कोलवा येथील कारावेला बीच रिर्सोट अदवानी हॉटेल्स अ‍ॅण्ड रिर्सोटस ( इंडिया लिमिटेड) चे सुरक्षा व्यवस्थापक लुईस डिकॉस्ता हे तक्रारदार आहेत. माहिती तंत्रज्ञान कायदा २000 कलम ७२ अंतर्गंत कोलवा पोलिांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे.मागच्या वर्षी १५ आॅगस्ट २०१८ ते ६ सप्टेंबर २०१८ दरम्यान ही घटना घडली आहे. सचदेव या कारावेला बीच रिर्सोटमध्ये सेल्स अँण्ड मार्केटींगच्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. ११ आॅगस्ट २0१८ कामावरुन त्यांना कमी करण्यात आले. संचालक तसेच सिस्टम अ‍ॅडमिनीस्टेटरला कुठलीही कल्पना न देता संशयिताने कारवेला बीच रिर्सोट गोवाच्या फेसबुक पेजची सेक्युरेटी आॅप्शन चालू करण्याचा प्रयत्न करुन ही पेज बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शक्य न झाल्याने संशयिताने ती फेसबुक पेज बदलून टाकण्याचाही प्रयत्न केला असे तक्रारीत नमूद केले आहे. संशयिताने हे कृत्य करुन गोपनियतेचा भंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फिलोमिना कॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

टॅग्स :FacebookफेसबुकPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडियाCrime Newsगुन्हेगारी