शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

वडिलांनी गरोदर मुलीची केली हत्या, दफन केलेला मृतदेह बाहेर काढल्यानंतर समोर आले सत्य 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 14:21 IST

आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून पोलिसांनीही त्याला ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्दे याप्रकरणी पोलिसांनी भा. दं. वि. कलम 302 आणि पुरावा लपविण्याची तसेच खोटी माहिती देण्याच्या कलम 201 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा मंतोलीला पोचले आणि वडिलांनी लोक काय बोलतील या भीतीपोटी मुलीने आत्महत्या केल्याचे गावातील लोकांत पसरवले.

कांडा येथील एका गावात गरोदर असलेल्या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याचे पसरवण्यात आले होते. मात्र, आत्महत्या नसून अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाचा खुलासा करताना पोलिसांनी सांगितले की, पोस्टमार्टम अहवालात अल्पवयीन मुलीच्या पोटात 16 आठवड्यांची गर्भधारणा झाल्याचे समोर आले आहे.आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून पोलिसांनीही त्याला ताब्यात घेतले आहे. या अल्पवयीन मुलीला गरोदर कोणी केली हे शोधण्यासाठी आता पोलिसांनी काही लोकांचे डीएनए नमुने घेण्याची तयारी केली आहे. रविवारी आरोपीला न्यायालयात हजर केले गेले. ही बाब समजल्यानंतर एसपी रचिता जुयाल यांनी याप्रकरणी तपास सुरू केला. ९ जुलै रोजी, अल्पवयीन मुलीच्या आईने कांडा कांदा पोलीस ठाण्यात अज्ञात लोकांवर मुलीवर बलात्कार केला आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार दाखल केली, त्याआधारे पोलिसांनी भा.दं. वि.  कलम 376/306 आणि 5 (एल)/६, पोक्सो कायद्याअन्वये गुन्हा  दाखल करण्यात आला होता.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मास्क नसल्यानं रोखलं तर महिलेचीच 'शिरजोरी'; म्हणे, तुमच्यासारख्या पोलिसांना विकास दुबे गोळ्या घालायचा!

 

बँकेची नोकरी सोडून बनला दरोडेखोरांचा कर्दनकाळ; या 'सिंघम'ने 57 जणांना दाखवला जेलचा रस्ता

 

कोण आहे अस्मिता, जिच्यावर पाळत ठेवून उत्तर प्रदेश पोलीस माहिती खोदून काढतायेत 

 

Video : मुंबईच्या रस्त्यावर हायप्रोफाईल ड्रामा; तिनं नवऱ्याला दुुसऱ्या स्त्रीसोबत पाहिलं, गाडीबाहेर खेचून मारलं!

Vikas Dubey Encounter : विकास दुबेच्या साथीदारांना कानपूर पोलीस विमानाने नेणार

डीएमच्या परवानगीने दफन केलेला मृतदेह काढण्यात आलाएसपी रचिता जुयाल यांच्या सूचनेनुसार सीओ कपकोट संगीता आणि पोलिस स्टेशन अधिकारी प्रल्हाद सिंह यांच्यासह 9 जुलै रोजी पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि डीएमच्या परवानगीने दफन केलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. जिल्हा मोबाइल फॉरेन्सिक युनिट अल्मोडा यांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले.पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये गळा दाबून हत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी मुलीच्या कुटूंबाची आणि शेजाऱ्यांकडे चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान वडिलांकडे पोलिसांची संशयाची सुई वळली आणि पोलिसांनी आणखी सखोल तपास केला. वडिलांनी लोकलज्जेखातर मुलीचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली.याप्रकरणी पोलिसांनी भा. दं. वि. कलम 302 आणि पुरावा लपविण्याची तसेच खोटी माहिती देण्याच्या कलम 201 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तत्पूर्वी पोलीस पथकाने आरोपी वडिलांना शनिवारी जेठाई-बागेश्वर रोडवरील गंगनाथ मंदिराजवळ अटक केली. अटक केलेल्या पोलीस पथकात सीओ संगीता, पोलिस स्टेशन अधिकारी प्रल्हाद सिंग, कॉन्स्टेबल अशोक कुमार, अशोक कुमार द्वितीय, भुवन प्रसाद यांचा समावेश होता.बागेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान मारेकरीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांची मुलगी मंतोली  गावात आपल्या आजोबांसमवेत राहत होती. ७ जुलैला अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे कुटुंबियांना समजले. यावरुन अस्वस्थ झाल्यानंतर वडील जेठाईकडे आपल्या घरी गेले.रात्री मंतोलीला वडील पोचले आणि मुलीच्या खोलीत गळा दाबून तिचा खून केला आणि कोणालाही न सांगता गुपचूप जेठाईकडे पुन्हा वडील परतले. दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा मंतोलीला पोचले आणि वडिलांनी लोक काय बोलतील या भीतीपोटी मुलीने आत्महत्या केल्याचे गावातील लोकांत पसरवले. आत्महत्येची बाब मानून ग्रामस्थांच्या सहकार्याने मृतदेह स्मशानभूमीत दफन करण्यात आला.

अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराचा तपास सुरू आहे.  संशयितांचे डीएनए नमुने घेतले जातील. डीएनए नमुना घेतल्यानंतरच अल्पवयीन मुलगी गर्भवती कोणापासून राहिली हे कळेल. - रचिता जुयाल, एसपी, बागेश्वर

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटकRapeबलात्कारSuicideआत्महत्या