भिवंडीत ट्रिपल तलाक प्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 20:12 IST2020-10-02T20:11:15+5:302020-10-02T20:12:24+5:30
Triple Talaq : तलाकचे मेसेज पाहून हुमाबानो यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत ट्रिपल तलाक दिल्याप्रकारणी पती विरोधात तक्रार दिल्या नंतर शांतीनगर पोलोसांनी मो जुनेद अंसारी याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भिवंडीत ट्रिपल तलाक प्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल
भिवंडी - मोबाईलवर पत्नीस ट्रिपल तलाक दिल्याची घटना शहरातील आमपाडा येथे गुरुवारी रात्री घडली असून या प्रकरणी पत्नीच्या तक्रारी वरून पती विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मो. जुनेद मो यासीन अंसारी ( वय ३३ रा आमपाडा चावीन्द्रा ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी पतीचे नाव असून त्याचा विवाह हुमाबानो ( वय ३० ) यांच्याशी झाला होता. २२ मार्च २०२० रोजी त्या आपल्या पतीकडे नांदवयास वेळी असता त्यांना पतीने मारहाण करून हाकलून दिले होते. पतीच्या जाचाला कंटाळून अखेर हुमाबानो या शहरातील नागाव येथे आपल्या वडिलांच्या घरी राहायला आली असता १० सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या काळात पती जुनेद याने पत्नी हुमाबानो यांना फोनवर ट्रिपल तलाक तसेच अरेबिक व उर्दू भाषेत देखील तलाकचे मेसेज त्यांच्या मोबाईल फोनवर पाठवले. तलाकचे मेसेज पाहून हुमाबानो यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत ट्रिपल तलाक दिल्याप्रकारणी पती विरोधात तक्रार दिल्या नंतर शांतीनगर पोलोसांनी मो जुनेद अंसारी याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.